केंद्रीय शिक्षणमंत्री ‘रमेश पोखरियाल निशंक’ १० डिसेंबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या मुद्यावर करणार चर्चा
नवी दिल्ली : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण जरी ऑनलाईन पद्धतीने होत असलं तरी, काही ठिकाणी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची मात्र शाळा सुरु झालेली आहे. कोरोनाचा वाढणारा संसर्ग आणि एकूण परिस्थिती पाहता परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाइन याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. पण असं असूनही आता CBSE बोर्डानं महत्वपूर्ण घोषणा करत आपली भूमिका जाहीर केली आहे.
२०२१ सालच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने न घेता लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तारीख अजूनतरी जाहीर करण्यात आलेली नाही. तरी त्यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर करण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘जर विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यावर वेगळा मार्ग शोधू, पण बोर्डाची परीक्षा ही ऑनलाइन नाही तर लेखी पद्धतीनेच घेण्यात येईल.’
परंतु ह्या परीक्षा पार पाडताना विद्यार्थी आणि शिक्षकांना कोव्हिडचे नियम पाळण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी हजर राहता आले नाही, तर त्यासाठीही आवश्यक त्या पर्यायांचा शोध घेण्यात येईल असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री ‘रमेश पोखरियाल निशंक’ यंदाच्या बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या मुद्यावर १०डिसेंबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली.
Dear all, 2020 has been a year of a great many changes like adjusting to #onlineeducation, adapting to #newnormal.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 2, 2020
Happy to share that I am going live on Dec 10 to talk about upcoming competitive/board exams with you.
Drop your concerns below using #EducationMinisterGoesLive. pic.twitter.com/E9bigQQRaL