रोगप्रतिकारक शक्ती आणि सकारात्मकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |

immunity_1  H x
 
 
रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास करताना केवळ शारीरिक पातळीवर बदल घडवणे उपयुक्त नसते, तर त्याचबरोबर मानसिक पातळीवरही सकारात्मक बदल घडवणे हे अत्यंत आवश्यक असते. मानसिक पातळीवर पाहता, रोगप्रतिकारक शक्तीचा माणसाच्या भावनात्मकेतशी थेट संबंध असतो. भावनिक ताणतणाव हे शरीरातील संप्रेरकांना बाधा पोहोचवत असतात वा संप्रेरकांमधील असंतुलन शेवटी आजाराला कारणीभूत ठरत असते. जसे आपण नेहमी म्हणतो तसेच मन हे अतिशय खोलपर्यंत कार्यरत असते. परंतु मन, अहंकार, बुद्धी, चित्त, अंत:करण अशा पातळ्यांवर या मनाचा अभ्यास करावा लागतो. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर Mind, will, understanding & subconscious यांचा अभ्यास करावा लागतो. अनेक वर्षांच्या अभ्यासाने, अनुभवाने व प्रयोगाने हे सिद्ध झालंय की, मानसिक स्थितीचा माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर सतत परिणाम होत असतो. म्हणूनच नुसते शारीरिक बदल घडवून आणणे, हे महत्त्वाचे नसून मानसिक पातळीवरसुद्धा बदल घडवावे लागतात, तरच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
 
 
कोरोनाच्या या भयंकर साथीमध्ये लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढे पितात, व्हिटॅमीन 'सी'च्या गोळ्या खातात, गरम पाणी पितात, नुसत्या याच गोष्टींनी जर रोगप्रतिकारक शक्ती वाढली असती, तर देशात कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसता, म्हणजेच काय तर हा रोगप्रतिकारक शक्ती माणसाच्या सर्वांगीण जडणघडणीवर व राहणीमान, सवयी, विचार या सर्वांवर अवलंबून असते. माणसाची मानसिक स्थिती कमजोर झाली की, त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला खिंडार पडलेच म्हणून समजा. योग्य व समतोल आहाराबरोबरच माणसाचे राहणीमान व त्याच्या आजूबाजूची परिस्थिती व त्या परिस्थितीनुसार त्याने त्याच्या शरीरात व मनात घडवून आणलेले बदल हे सर्व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत किंवा कमकुवत करण्यास कारणीभूत असतात.
 
 
माणूस ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणाचा त्याच्यावर सतत परिणाम होत असतो. जर त्या माणसाने भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतले नाही, तर मात्र मग वातावरणातील घटक हे त्याला भारी पडू लागतात. पर्यायाने त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही कमकुवत होण्यास सुरुवात होते. वातावरण याचा अर्थ फक्त नैसर्गिक बदल किंवा हवामान असा नाही, तर वातावरण म्हणजे आपण जिथे राहतो, वावरतो त्याच्या आजूबाजूची परिस्थिती आजूबाजूच्या समाजाची मानसिकता, कार्यालयामधील लोकांची मित्रमंडळींची, शेजार्‍यांची, मानसिकता या सर्वांनी मिळून एक वातावरण बनते. यात जर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल, तर सर्वप्रथम असावी लागते ती वातावरणाशी सकारात्मक पद्धतीने जुळवून घेण्याची प्रवृत्ती. सकारात्मक 'Adaptation' असेल, तर माणूस हा सहजतेच्या प्रांतात असतो. जर नकारात्मकता असल्यास तो असहजतेच्या प्रांतात जातो, त्याची सहजता निघून जाते व तो आजारी पडतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय व बदल घडवू शकतो. परंतु त्यासाठी पाहिजे ती मानसिक तयारी आणि सहजता व सकारात्मकता.
 
 
- डॉ. मंदार पाटकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@