आमच्या सर्वांसाठी सर्वोच्च हीत देशहीत : पंतप्रधान मोदी

    31-Oct-2020
Total Views | 72


pmo_1  H x W: 0



केवडीया :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे जाऊन सरदार पटेलांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. यानंतर ते राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्येही सहभागी झाले. यावेळी त्यांनी जवानांना शपथही दिली. जवानांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत पंतप्रधान मोदींना सलामी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सीप्लेन सेवेचीही सुरुवात करणार आहेत. ते आज दुपारी १ वाजता वॉटर एरोड्रमचे उद्घाटन करतील. तसेच, सीप्लेन सेवेचेही उद्घाटन करतील.





यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत मोदी भावुक झाले. ते म्हणाले, काही लोकांनी पुलवामा हल्ल्यात देखील राजकारणाची संधी शोधली. पुलवामावर राजकारण करणाऱ्यांना देश विसरणार नाही. त्यावेळी मी त्यांच्या घाणेरडी वक्तव्ये ऐकत राहिलो. त्यावेळी जे आरोप झाले हे देश विसरू शकणार नाही. देशावर इतका मोठा आघात झालेला असताना कशी वक्तव्ये दिली गेली हे देश विसरू शकणार नाही. तेव्हा स्वार्थ आणि अहंकाराने भरलेले राजकारण शिखरावर होते. शेजारी देशाच्या संसदेने सत्य स्वीकारले आहे, त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतील, पुलवामा हल्ल्यानंतर केले गेलेले राजकारण हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असे म्हणत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला.



पुढे ते म्हणतात, देशाच्या हितासाठी, आमच्या सुरक्षादलांच्या मनोबलासाठी, कृपा करून असे राजकारण करू नका असे मी राजकीय पक्षांना आग्रह करेन. आपल्या स्वार्थासाठी नकळतपणे देशविरोधी शक्तीच्या हाती लागून तुन्ही ना देशाचे भले करू शकाल, ना स्वत:च्या आपल्या पक्षाचे. आमच्या सर्वांसाठी सर्वोच्च हीत देशहीत आहे. सर्वांच्या हिताचा विचार केल्यानंतरच सर्वांची प्रगती आणि उन्नती होईल. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, काही लोक दहशतवादाचे खुलेपणाने समर्थन करत आहेत, दहशतवाद-हिंसेने कोणाचेही कल्याण होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121