काश्मीर खोऱ्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा

    03-Aug-2019
Total Views | 44


 


श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये शॉपियन व सोपोर येथे झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत चार दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आले आहे. यात एक जवान जखमी झाला असल्याची माहिती आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. शॉपियन येथे शुक्रवारपासून सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले. मंजूर भट्ट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो हिजबुल मुजाहिदीन या संघटनेत सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली.

 

तर दुसरीकडे सोपोर येथील मालमपनपोरा आणि वारपोरा गावाजवळ झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर यात एक जवान जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याबाबत सुरक्षा यंत्रणा तपास घेत असून या परिसरात सुरक्षादलाने शोध मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१९ या काळात ९६३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121