दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग

    17-Aug-2019
Total Views | 32

 

दिल्ली: एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घटली आहे. अग्निशामक दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रॉनिकचे काम सुरु आहे. त्यामुळे ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून केले जात आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते. आग लागताच रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लागली असली तरी सर्वत्र धुराचे लोळ पसरले आहेत. रुग्णालयाच्या टिचिंग ब्लॉकमध्ये ही आग लागली आहे.

 

दरम्यान, एम्स रुग्णालयातील इमरजन्सी वॉर्डजवळ ही आग लागली आहे. तसेच रुग्णालयात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे देखील याच रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालयात दिवसभर अनेक नेत्यांची ये-जा सुरु आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121