दक्षिण मुंबईत परदेशी माकडांची तस्करी; मलेशियावरुन आलेली माकडे मुंबई विमानतळावरुन बाहेर कशी पडली ?

    06-May-2025
Total Views |
exotic monkey sized



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ठाणे वन विभागाने रविवार दि. ४ मे रोजी दक्षिण मुंबईतील एका हाॅटेलवर छापा टाकून परदेशी माकडांची तस्करी उघडकीस आणली (exotic monkey sized). मात्र, या कारवाईत वनकर्मचाऱ्यांना आठ माकडे ही मृतावस्थेत, तर एक माकड जिवंत मिळाले (exotic monkey sized). या कारवाईमधून मलेशियन नागरिकत्व असलेल्या एका परदेशी महिलेला वन विभागाने ताब्यात घेतले असून तिने हवाई मार्गाने ही माकडे मुंबईत आणली आहेत (exotic monkey sized). त्यामुळे मुंबई विमानतळाच्या सुरक्षेमधून ही माकडे कशी बाहेर पडली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (exotic monkey sized)


दक्षिण मुंबईतील कुलब्यामधील हाॅटेल जनतामध्ये परदेशी माकडांची तस्करी होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या तस्करीमध्ये चेन्नईस्थित एक व्यक्ती आणि एका परदेशी नागरिक असलेल्या महिलेचा हात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार ठाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ४ मे रोजी हाॅटेल जनतावर छापा टाकला. त्याठिकाणी त्यांना एका खोलीत चेन्नईतील रहिवासी श्रीराम सुब्रमनीयना आणि मथावी संल्लाकुन्हू ही परदेशी महिला नागरिक सापडली. त्यांची तपासणी केली असता वनकर्मचाऱ्यांना खोलीत चार सायमन गिब्बन प्रजातीची माकड, तीन गोल्डन गिब्बन मंकी आणि दोन पिगटेल मकाक माकडे आढळली. मात्र, त्यामधील एक पिगटेल मकाक माकड सोडल्यास इतर आठ माकडे मृत होती.

वन विभागाने ताब्यात घेतलेल्या गिब्बनचा समावेश हा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या चौथ्या श्रेणीमधील सायटिस परिशिष्ट १ मध्ये होत असून पिगटेल मकाक माकडांचा समावेश हा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत होतो. त्यामुळे दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ५ मे रोजी न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपी असलेल्या परदेशी महिलेने ही माकडे मलेशियावरुन हवाई मार्गाने मुंबईत आणल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील सुरक्षेमधून ही माकडे कशी बाहेर पडली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कारवाई ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षक के. प्रदिपा आणि उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक सोनल वळवी, वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश भोईर यांनी केली. या कारवाईत वनपाल पंकड गढरी, वनरक्षक सुरेंद्र पाटील, स्वप्नाली यांदव, सचीन नागरगोजे, विक्रम पवार हे सहभागी होते.