
शीख यात्रेकरूना व्हिसा-मुक्त करतारपूर साहिबाला जाणे शक्य
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला डेरा बाबा नानक येथील दरबार साहिब गुरुद्वाराला जोडणार्या साडेचार किलोमीटर लांबीच्या करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करणार आहेत. शनिवारी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी ही घोषणा केली, ज्यांनी सांगितले की, ''८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी डेरा बाबा नानक येथे येणार आहेत आणि ते करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करतील.''
पुढे माध्यमांशी बोलताना बादल म्हणाल्या की, ''उद्घाटनानंतर पंतप्रधान सुलतानपूरमधील लोधी याठिकाणी भेट देतील. ११ नोव्हेंबरला गृहमंत्री अमित शहा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती मंचाला भेट देतील. " पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबरमध्ये गुरु नानक देवजी यांच्या प्रकाश पर्व सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण स्वीकारले होते. भारतीय शिख केवळ दुर्बिणीनेच या ठिकाणी जात असत. करतारपूर पाकिस्तानच्या नरेवाल जिल्ह्यात आहे. भारतीय सीमेपासून त्याचे अंतर अवघ्या तीन किलोमीटर आहे. हा कॉरिडोर पाकिस्तानच्या करतारपूरमधील दरबार साहिबला पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक समाधीशी जोडेल आणि भारतीय यात्रेकरूंना व्हिसा-मुक्त जाणे येणे शक्य होईल, पण करतारपूर साहिब दर्शनासाठी परवानगी घ्यावी लागेल. प्रस्तावित करतारपूर कॉरिडोर दरबार साहिबला पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकशी जोडेल आणि भारतीय यात्रेकरूंना व्हिसा-रहित प्रवास करता येणार आहे. केवळ करतारपूर साहिबला जाण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. १५२२मध्ये गुरु नानक देव यांनी करतारपूर साहिबची स्थापना केली होती.