गुगल प्ले स्टोअरवरील ‘या’ ६ अॅप्सवरून होतो डेटा लीक

    07-Jan-2019
Total Views | 18

 

 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोअरवरील ६ अॅप्सवरून जगभरातील २०० देशांतील युजर्सचा डेटा लीक होत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. हॅकर्स स्पायवेअरच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅटवरील यूजर्सचा डेटा लीक करत आहेत. व्हॉट्सअॅपकडे आज सोशल मीडियावरील एक प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जाते. जगभरातील २०० देशांमधील फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅटवरील यूजर्सचा डेटा स्पायवेअरच्या माध्यमातून लीक करण्याचा प्रकार सुरु होता. गुगल प्ले स्टोअरवरील ६ अॅप्सच्या माध्यमातून हा डेटा लीक केला जात होता. आतापर्यंत हे ६ अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून १ लाखांहून अधिक अँड्रॉइड यूजर्सनी डाऊनलोड केले आहेत.
 

त्या ६ अॅप्सची नावे खालीलप्रमाणे :

Flappy birr,

 

Flappy birr dog,

 

Flashlight,

 

HZPermis Pro Arabe,

 

Win7Simulator,

 

Winlauncher
 

‘ANDROIDS_MOBSTSPY’ या स्पायवेअरच्या माध्यामातून वरील ६ अॅप्सद्वारे यूजर्सचा डेटा लिक केला जातो. एखाद्या यूजरने या ६ अॅप्सपैकी कोणताही एक अॅप गुगल प्ले स्टॉअरवरून डाऊनलोड केला असता हा स्पायवेअर त्या यूजरच्या डिव्हाइसमधील इंटरनेट कनेक्शनला हॅक करते. त्यानंतर हे कनेक्शन आपल्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरला जोडण्याचे काम हे स्पायवेअर करत होते. हे कनेक्शन जोडल्यानंतर त्या यूजरच्या डिव्हाइसमधील सर्व माहिती सहजरित्या हॅक केली जात होती. असे एका संशोधनामुळे समोर आले आहे. यूजर्सचे कॉल डिटेल्स, फोटो, वैयक्तिक मॅसेज, कॉन्टॅक्ट्स, ऑडिओ, व्हिडिओ हे सारे हॅक केले जात होते. तसेच यूजर्सच्या स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील डेटादेखील या स्पायवेअरद्वारे हॅक केला जात होता. या स्पायवेअरबाबात कळताच गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून हे ६ अॅप्स तातडीने हटविले. परंतु १ लाखांहून अधिक यूजर्सनी हे अॅप्स डाऊनलोड आणि इन्सटॉल केले होते. त्या यूजर्सचा डेटा लीक झाला आहे की नाही? याबाबत गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121