कोकण किनारपट्टीवरील जैवविविधतेचे मापन करणारा ‘प्रोजेट कोस्टल २.०’ हा प्रकल्प नुकताच पार पडला. या प्रकल्पाच्या माध्यमातून उलगडलेल्या कोकणातील किनारी जैवविविधता आणि किनारी प्रदेशात राहणार्या समुदायांच्या सहसंबंधाविषयी ऊहापोह करणारा लेख...
Read More
उजनी धरणाला रामसर पाणथळ क्षेत्रााचा दर्जा मिळवून देण्यासाठी या पक्षी गणनेच्या माध्यमातून शास्त्रीय माहितीचे संकलन होत आहे. (ujani dam bird biodiversity)
समाजात विविध प्रकारची लोकोपयोगी कार्य करणारी खूप माणसं आहेत. मात्र, आज काळाची गरज ओळखून निसर्गाला आपले मित्र बनविणार्यांपैकी राजीव पंडित हे खासच! त्यांच्याविषयी...
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावातील गवताळ प्रदेशाला 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्यासंदर्भात पहिले पाऊल पडले आहे (kiraksal biodiversity heritage site). शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी 'महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा'च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत किरकसालला भेट दिली (kiraksal biodiversity heritage site). यावेळी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्यासंदर्भात सहमती दर्शवली. किरकसालला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्ज
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ( Life Giver ) ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...
पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीची गरज असतेे. ‘नवे महाबळेश्वर’ या प्रकल्पासाठीदेखील (new mahabaleshwar project) एकजुटीची आवश्यकता असून आता तिथे काय होणार, कोण करणार, त्याचे चांगले वाईट परिणाम याबद्दल चर्वितचर्वण झाले आहे (new mahabaleshwar project) . मात्र, महाराष्ट्रातील नागरिक म्हणून आपण काय करणे गरजेचे आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...(new mahabaleshwar project)
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेच्या कुशीत वसलेल्या तिलारी (tillari biodiversity) या जैवसंपन्न प्रदेशाबद्दल माहिती देणारा हा लेख...
कोयंबतूरच्या 'स्पिलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया' (एसएआय) या संस्थेने 'वर्ल्डवाईडफंडफॉरनेचर'(WWF) संस्थेच्या साहाय्याने महाबळेश्वरमधील 'राॅबर्स गुहे'मध्ये गेले वर्षभर संशोधनाचे काम केले (Mahabaleshwar robbers cave). स्थानिक गावकरी या गुहेला 'शिन-शिन घळ' म्हणून ओळखतात (Mahabaleshwar robbers cave). गेल्या वर्षभरात संशोधकांनी या गुहेमधील जैवविविधता अभ्यासणाचे काम केले, सोबतच या गुहेला असणारे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व देखील टिपले. (Mahabaleshwar robbers cave)
उरणमधील पाणथळी (uran wetland) म्हणजे जैवविविधतेचा ठेवा. पक्षीअभ्यासकांसाठी स्वर्ग असलेला हा प्रदेश आता संकटात सापडला आहे (uran wetland). येथील पाणथळींवर सततचे होणारे अतिक्रमण पक्षी विविधतेच्या मुळावर उठले आहे. याच पाणथळी वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देणारा हा लेख. (uran wetland)
कोकणातील जैवविविधतेशी संबंधित असणार्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी ‘कोकण कलेक्टिव्ह’ या संकल्पनेअंतर्गत ‘कोकण डायलॉग’ ही कार्यशाळा दि. 13 जुलै रोजी पुण्यात पार पडली. या कार्यशाळेत झालेल्या चर्चेचा हा विस्तृत आढावा....
आंबोलीतील काळ्या बिबट्याचे म्हणजेच ब्लॅक पॅंथरचे ( black panther ) पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. मात्र, यावेळीस हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे ( black panther ). मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहलीदरम्यान या प्राण्याचे दर्शन झाले. ( black panther )
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या (sgnp bird) पक्ष्यांच्या यादीत दोन प्रजातींची भर पडली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) उद्यानामध्ये (sgnp bird) केलेल्या पक्षी सर्वेक्षणात दोन नवीन पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या 'बीएनएचएस'कडून उद्यानामध्ये दिर्घकालीन पक्षी गणनेचे काम सुरू आहे. ( sgnp bird )
पृथ्वीचे सौंदर्य हे निसर्गतः असलेल्या जैवविविधतेमुळे फुललेले. जैवविविधतेमध्ये विविध प्राणी, पक्षी, फुलांच्या, झाडांच्या आणि निसर्गातील अनेक जीवांचा समावेश होतो. पाण्यातील, जंगलातील, जमिनीवरील परिसंस्था या आणि अशा अनेक परिसंस्थांचा समावेश असणार्या प्रजातींमध्ये प्रदेशनिष्ठ प्रजातींचाही समावेश होतो. अशा या प्रदेशनिष्ठ प्रजाती, त्यांचे महत्त्व आणि वातावरण बदलाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, हे आपण पाहू. पण, तत्पूर्वी या प्रदेशनिष्ठ प्रजाती नेमकं कशाला म्हणतात, हे समजून घेऊया. एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित असल
गेल्या काही काळात वातावरणातील दीर्घकालीन बदलांविषयी संशोधन आणि जागृतीही वाढलेली दिसते. या बदलांविषयी जैवविविधतेच्या घटकांवरील तसेच अखंड मानवजातीवरील परिणाम यानिमित्ताने प्रकाशझोतात येत आहेत. अशाप्रकारचे संशोधन, अभ्यास समोर आल्यास निश्चितच त्याचा उपयोग जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करणे शक्य होणार आहे.
दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशाने सार्वमताने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील संरक्षित क्षेत्रामध्ये भविष्यातील सर्व खनिज तेलासाठीचे ‘ड्रिलिंग’ थांबवण्याचा निर्णय नुकताच घेतला. इक्वेडोरच्या पूर्वेकडील अॅमेझॉनमधील यासुनी नॅशनल पार्कमधील ठरावीक जागेवर कच्च्या तेलाचे उत्खनन करावे का करू नये, हे ठरवण्यासाठी लाखो लोकांची देशव्यापी जनमत चाचणीत घेण्यात आली.
आफ्रिका खंड हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध असलेला जगातील खंड. प्राणी, पक्षी, वनस्पती, मासे अशा जगभरातील परिचित प्रजातींपैकी दहा टक्के प्रजाती केवळ आफ्रिकेत आढळतात. शिकारी आणि वृक्षतोड यांबरोबरच इथल्या जैवविविधतेला अनेक धोके सध्या निर्माण झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक मूल्यवान असलेल्या तेलाच्या उत्खनन प्रक्रियेत जैवविविधतेचा मात्र विचार होतोच असे नाही.
पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती लाभलेल्या ग्रीसमधील रोड्स बेट सध्या वणव्याच्या धगीत होरपळत आहे. मागील सहा दिवस ग्रीसमधील रोड्स बेटावर वणव्याने अक्षरश: थैमान घातले. हवामान बदलाचा प्रभाव आणि त्यामुळे तीव्र झालेल्या उष्णतेच्या लाटांमुळे ही आग लागली. रविवार, दि. २३ जुलै रोजी सुटलेल्या वादळी वार्यामुळे ती अधिकाअधिक पसरतच चालली आहे. सलग आठवडाभर सुरू असलेल्या या वणव्यामुळे पर्यावरणाचे आणि रोड्स बेटावरील जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होत आहे. देशभरात हा जंगलातील आगीचा धोका अजून कायम असून, येणार्या उष्णतेच्या लाटांमुळे ह
मुंबईत शेकडोंच्या संख्येने वृक्षारोपण करणार्या ग्यानमल भंडारी यांची ही गोष्ट. झाडे लावून, जगवून आणि ती पुन्हा जळली तरी निराश न होता, त्यांची पुनर्लागवड करणार्या या ‘ट्री-मॅन’विषयी...
‘ग्रीन्स स्कूल प्रोग्राम’चे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून ओळख असलेले डोंबिवलीतील भरत गोडांबे हे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये निसर्गाविषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविषयी...
पृथ्वीवर अस्तित्वात असलेली जैवविविधता, या वसुंधरेवरील अनेक छोट्या-मोठ्या परिसंस्था, या परिसंस्थांचे पृथ्वीवरील वातावरणीय तसेच इतर समतोल राखण्यासाठी असे आपापल्या ठिकाणी आगळेवेगळे महत्त्व आहे. हा समतोल राखला गेला नाही, तर त्याचे काय आणि किती गंभीर परिणाम भोगावे लागतात, ते या ना त्या प्रकारे आपण अनुभवतो आहोतच. नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधतेसाठीचा दिवस साजरा केला गेला. २००० साली संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधतेसाठीचा दिवस म्हणून घोषित केला.
‘राखूया सृष्टीचे भान, करूया निसर्गाचा सन्मान’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘सृष्टीभान’ संस्था कार्यरत आहे. ही नोंदणीकृत संस्था असून, शहराच्या आसपास नष्ट होत चाललेली जैवविविधता व उपलब्ध असलेला निसर्ग व जैवविविधता याचा अभ्यास व नोंदणी करून त्याची जनजागृती करण्याचे काम करते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत निसर्गसृष्टीशी तादात्म्य पावत संस्था अंखड कार्यरत आहे. अशा या पर्यावरण रक्षणासाठी झटणार्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
जागतिक हवामान बदलाचा मोठा फटका भारतासह उपखंडाला बसलेला दिसतो. जागतिक हवामान संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात यासंबंधी भारताला खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहे. विशेषतः अन्नधान्य सुरक्षा याबाबत भारताने उपाययोजना राबवावी, असे हा अहवाल सांगतो. त्यानिमित्ताने आपले ईप्सित साध्य करण्यासाठी भारतही सज्ज आहे.
प्रदूषण हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि वैश्विक स्तरावर ऐरणीवर आलेला प्रश्न. मानवासाठी हा प्रश्न दिवसेंदिवस जटील ठरत असला, तरी त्यावर विविध उपाय शोधण्याचे प्रयत्नही तितक्याच वेगाने सुरु आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नुकतेच ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन’ म्हणजेच (International Zero Waste Day)हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पुढाकारातून गुरुवार, दि. ३० मार्च रोजी जगभर साजरा करण्यात आला.
मागील लेखात आपण ब्रिटिश काळात महसूल निर्मितीच्या उद्देशाने सुरू झालेल्या वन व्यवस्थापनाचा १९७०च्या दशकापर्यंतचा प्रवास पहिला. या भागात वन व्यवस्थापन आणि त्याच्याशी निगडित संशोधनाचा आतापर्यंतचा विस्तार जाणून घेऊ.
जैवविविधतेचे नंदनवन असलेल्या कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडले असून आणि महाराष्ट्राला निसर्ग पर्यटनाची विपुल संधी प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर आणि भोगवे या तीन ठिकाणी तर रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच ठिकाणी कोस्टल टाइड पूल टुरिझम विकसित करण्याची संधी आहे. या माध्यमातून स्थानिकांना उपजीविकेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
आपल्या घरामागील अंगणात, एक परिसंस्था इतकी अद्वितीयआहे की ती आपल्या कल्पनेच्या मर्यादा तपासते. हे ऑस्ट्रेलियातील ‘ग्रेट बॅरियर रीफ’सारखेच वैविध्यपूर्ण आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यात आणि वातावरणातील कार्बन शोषून घेण्यात महत्त्वाची भूमिका असूनही, ‘आंग्रिया बँके’चा कोरल रीफ - आपल्याला क्वचितच माहीत आहे. याच ‘आंग्रिया बँक’ची माहिती देणारा हा लेख...
जगाच्या नकाशावर आंबोलीला एका क्लिकवर ‘आंबोली टुरिझम’मार्फत निर्णय राऊत या युवकाने उपलब्ध करत तेथे बारमाही विविध पर्यटन सेवा सुरू केली. त्यानंतर आता आंबोली परिसरातील महत्त्वपूर्ण जैवविविधता पाहता त्याच्या संवर्धनासाठी तसेच सर्व निसर्गप्रेमी, अभ्यासक आदी सर्वांसाठी ‘आंबोली टुरिझम’मार्फत लवकरच आगळेवेगळे असे पहिलेच ‘आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. सदर ‘आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर’ सर्वांसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती ‘आंबोली टुरिझम’चे निर्णय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे असंख्य निसर्
तमिळनाडूतून तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
सिंधुदुर्गच्या तिलारी मधील केर-भेकुर्ली भागातून नाकाड्या चापडा ('हम्प नोज पिटवायपर') या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. तिलारीतील वन्य अभ्यासकांनी ही नोंद केली आहे.
कालच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस जैविक संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि जागतिक जैवविविधतेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्गसंपन्न सह्याद्रीची जैवविविधता ही समृद्ध आहे परंतु त्याचे रक्षण होणे ही तितकेच गरजेचे आहे. याचाच आढावा घेणारा हा लेख.
ठाणे खाडी परिसरात नुकतेच रामसर स्थळाच्या यादीकरिता दहा किमीपर्यंतचा भाग ‘हरित प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जैवविविधतेचा खजिना असलेल्या पाणथळींविषयी...
‘पर्यावरण’ आणि ‘जैवविविधता’ हे शब्द जरी लहान असले, तरी त्यांची व्याख्या जेवढी सांगावी तेवढी कमीच आहे. सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील प्रदेश हा माण तालुका नेहमी दुष्काळाने व्यापलेला दुर्लक्षित असा प्रदेश, अशी भावना लोकांमध्ये होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून माणदेश पक्ष्यांच्या जैवविविधतेने बहरत आहे. त्याविषयी घेतलेला आढावा... mandesh
‘वेला’ प्रदेश म्हणजेच सागरी किनारा आणि त्या आसपासचा भरती-आहोटीच्या क्षेत्रात येणारा परिसर. या परिसरामध्ये समुद्र आणि जमीन यांची सरमिसळ असते. याच परिसरामधील एक परिसंस्था म्हणजे खाडीची. महाराष्ट्राला समृद्ध खाड्यांचा प्रदेश लाभला आहे. यामधील काही खाड्यांची आणि त्यामधील जैवविविधतेची ओळख करुन देणारा हा लेख... konkan creek
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे.
प्रत्येक परिसराची पक्षीविविधता कालानुरूप बदलत असते. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये झालेल्या बदलानुसार पक्ष्यांच्या प्रजातीदेखील त्या परिसरांतून नामशेष होत असतात. अशाच प्रकारे शतकानुरूप खानदेशातील पक्षीजैवविविधतेमध्ये झालेल्या बदलांचा ऊहापोह करणारा हा लेख...
जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यास्तव वसुंधरेचं देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे.
भारतीय समाजात पालींविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यांचे संशोधनही दुर्लक्षित राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये देशात पालींविषयी अभ्यास करणारी तरुण संशोधकांची फळी तयार झाली असून संशोधक अक्षय खांडेकर त्यामधील एक प्रतिनिधी आहेत. ते ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मध्ये कार्यरत असून आजवर साधारण पालींच्या 35 नव्या प्रजातींचा शोध त्यांनी लावला आहे. पालींच्या विश्वातील अनेक अज्ञात प्रश्नांची उत्तरे देणारी खांडेकर यांची ही मुलाखत...
धनेश हा पक्षी केवळ दिसायलाच वेगळा नाही, तर त्याची वागणूकदेखील इतर पाखरांपासून अलहिदा आहे. भारतात या पक्ष्याच्या नऊ जाती आढळतात. श्रीलंकेत सापडणारा ’श्रीलंका राखी धनेश’ जोडला, तर त्यांची संख्या दोन आकडी होते.
पश्चिम घाटामध्ये अधिवास करणार्या अनेक दुर्मीळ जीवांपैकी एक जीव म्हणजे उडणारा सरडा. साधारण मध्य आणि दक्षिण पश्चिम घाटामध्ये आढळणार्या या सरड्याची नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातूनही करण्यात आली आहे. जाणून घेऊया या रहस्यमयी उडणार्या सरड्याविषयी...
भारतातील फुलपाखरांच्या प्रजातींमध्ये नव्या फुलपाखराची भर पडली आहे. पश्चिम घाटामधील केरळच्या अगस्तमलाई डोंगररांगांमधून 'नाकाडूबा' कुळातील नव्या प्रजातीच्या फुलपाखराचे संशोधन उलगडले आहे. महत्त्वाचे म्हणजे इतिहासात प्रथमच पश्चिम घाटामधून संपूर्णपणे भारतीय संशोधकांच्या चमूने फुलपाखराच्या एखाद्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील महादेव मंदिर परिसर हे 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा मासा जगात केवळ याच परिसरात आढळत असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे 'जैविक वारसा स्थळ' असून देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून एखाद्या माशाच्या संवर्धनासाठी संरक्षित करण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या खोर्यात आढळणारी वन्यजीवांची प्रदेशनिष्ठता ही थक्क करणारी गोष्ट आहे. सोप्या भाषेत प्रदेशनिष्ठता म्हणजे एखादी गोष्ट स्थानिक असणे. थोडक्यात, एखादा जीव जगामध्ये केवळ विशिष्ट भूभागामध्येच आढळत असल्यास त्याला इंग्रजीमध्ये ‘एन्डेमिक’ आणि मराठीत ‘प्रदेशनिष्ठ’ असणे म्हणतात. सह्याद्री च्या पर्यावरणीय परिसंस्थेत प्रतिकिलोमीटर प्रदेशनिष्ठ जीवांची ही विविधता बदलते. प्रामुख्याने ही प्रदेशनिष्ठता छोट्या जीवांमध्ये आढळते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या संवर्धनासाठी आंबोलीकर एकवटले आहेत. गुरुवारी महाशिवरात्रीचे निमित्त साधून या प्रदेशनिष्ठ माशांबद्दल गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. जगात केवळ आंबोलीमध्ये सापडणाऱ्या या माशाच्या संवर्धनासाठी मंदिर परिसराला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा देण्याची मागणी 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'कडून करण्यात आली आहे.
जैविक विविधता कायद्याअंतर्गत घोषणा
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे आदेश
अॅलीगेटर गार हा मासा भारतात आढळत नाही.
गिधाडांच्या अस्तित्वाचा आढावा घेणारा हा लेख...
वन आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनेचा मच्छीमारांना लाभ
उरणमधील पाणथळींचा प्रदेश सध्या सरकारी अनास्थेमुळे संकटात सापडला आहे.
राज्याच्या बहुतांश किनाऱ्यांवर दर्शन