रहस्य ‘आंग्रिया बँक’चे

    04-Jul-2022
Total Views | 98
आन्ग्रीया
 
 
आपल्या घरामागील अंगणात, एक परिसंस्था इतकी अद्वितीयआहे की ती आपल्या कल्पनेच्या मर्यादा तपासते. हे ऑस्ट्रेलियातील ‘ग्रेट बॅरियर रीफ’सारखेच वैविध्यपूर्ण आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यात आणि वातावरणातील कार्बन शोषून घेण्यात महत्त्वाची भूमिका असूनही, ‘आंग्रिया बँके’चा कोरल रीफ - आपल्याला क्वचितच माहीत आहे. याच ‘आंग्रिया बँक’ची माहिती देणारा हा लेख...
 
 
अथांग समुद्राच्या तळाशी वसलेले हे पठार इतिहासकार आणि खलाशांमध्ये सुप्रसिद्ध आहे. मराठा साम्राज्यातील सर्वात यशस्वी ‘अ‍ॅडमिरल’ आणि नौदल ‘कमांडर’ कान्होजी आंग्रे यांना आदरांजली म्हणून याचे नाव ‘आंग्रिया बँक’ असे दिले गेले. ऐतिहासिकदृष्ट्या हा नौदल तळ होता. कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या सैन्याने 1698 ते 1729 हे तळ वापरून जहाजांसाठी सुरक्षित नांगरीचे ठिकाण असल्याने त्याची स्थापना करण्यात आली. पोर्तुगीज, डच आणि नंतर ब्रिटिशांच्या आक्रमणांपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या रक्षणात महत्त्वाचे स्थान होते.
 
 
भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून, विशेषतः, महाराष्ट्रातील विजयदुर्गापासून 105 किमी (65 नॉटिकल मैल)वर स्थित आहे. आंग्रिया पठाराची लांबी 40 किमी, तर रुंदी 19 किमी आहे. हा संपूर्ण बेसाल्ट दगडाने बनलेला पट्टा 20 ते 200 मीटरपर्यंत खोल आहे. पठाराचा शेवट अचानकपणे होतो आणि कडा खालच्या दिशेने सुमारे 400 फूटपर्यंत उतरतो. हा परिसर सागरी जैवविविधतेचा खजिनाही आहे, असे गेल्या तीन दशकांत आढळून आले. एका चौरस मीटर क्षेत्रात, शेकडो प्रजाती राहतात आणि त्या दहा हजार वर्षांहून अधिक जुनी असण्याची शकता आहे. त्यापैकी अनेकांची नावे अद्याप दिली गेली नाहीत. ‘होलोसीन’ समुद्राची पातळी वाढल्यानंतर खडकांच्या विकासासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर या बँकेचा विकास सुरू झाला असे म्हटले जाते. ‘आंग्रिया बँक कोरल’चे वैशिष्ट्य म्हणजे, समुद्राच्या मध्यभागी असलेले त्याचे स्थान इतर प्रवाळांपेक्षा वेगळे आहे.
 
 
आन्ग्रीया1
 
 
 
‘वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी-इंडिया’ मोहिमेचा एक भाग म्हणून 2019 मध्ये 14 सदस्यांच्या टीमसह ‘आंग्रिया बँक’ मोहिमेचे नेतृत्व करण्याची आणि सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली. त्यादरम्यान मी जे पाहत होतो, त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. मी ‘आंग्रिया बँके’च्या खोलवर जाताच, प्रवाळांच्या खड्ड्यांमध्ये अनेक मासे पोहत, आत बाहेर करत होते.
उत्सुकतेने आम्ही पुढे सरकलो. आमच्या आश्चर्यात भर पडली. समुद्राच्या मजल्यावर आम्ही बहुरंगी रीफ माशांची खरी ‘सिम्फनी’ पाहिली. शेंदरी लाल, कॅनरी पिवळा, लिंबूवर्गीय केशरी आणि गर्द जांभळ्या रंगाच्या विपुलतेमध्ये आम्ही खडकाच्या काठावर वाढणार्‍या दाट झाडीत काही काळ पोहत होतो. हे सगळे जणू काही विद्युत निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर होते. आम्ही ‘ग्रुपर्स’ आणि ‘स्नॅपर्स’ना पसमुद्र तळावरील खडकांमध्ये खड्ड्यांमध्ये धडपडताना पाहिले. ते ही अशा ठिकाणी जिथे क्वचितच कोणी गेले असेल.
 
 
आम्हाला ‘कोरल’ आणि ‘इगल रे’देखील पाहायला मिळाले. जे मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. काही ‘कोरल’ ‘मारुती’ वाहनाच्या आकाराइतके मोठे होते. जेव्हा मी ‘आंग्रिया बँके’त घेतलेली कोरल चित्रे पाहण्यास सुरुवात केली तेव्हा मला असे प्राणी आढळले की, ज्यांचे अस्तित्व, सागरी जीवशास्त्रातील माझी पदवी आणि नैसर्गिक इतिहासात खोल रस असूनही मला अज्ञात होते. एकूण आम्ही 111 वेगवेगळ्या वंशातील प्रवाळांच्या 1,286 प्रजाती आणि रीफ माशांची अपवादात्मक विविधता नोंदवली. 172 प्रजातींच्या रीफ माशांच्या तीन हजारांहून अधिक नमुन्यांची नोंद झाली आहे. रीफ माशांची विविधता स्थिर परिसंस्थेचे चिन्हक आहे. सर्वात मुबलक माशांच्या समूहाचे प्रतिनिधित्व ‘प्लँक्टिव्होर्स’, त्यानंतर ‘पिस्किव्होर्स’, सर्वभक्षक आणि शाकाहारी मासे करतात. आम्ही दोन ‘टॅव्नी नर्स शार्क’, तीन ‘स्पॉटेड इगल रे’ आणि एक गुलाबी ‘व्हिपरे’देखील पाहिले.
 
 
 

आन्ग्रीया3
 
 
खाद्यासाठी ‘कोरल’वर अवलंबून असलेल्या माशांची उच्च विपुलता नोंदवली गेली आहे. 11 प्रजातींच्या तब्बल 200 नमुन्यांची नोंद करण्यात आली. हे एका निरोगी रीफ प्रणालीचे मानक आहे. याव्यतिरिक्त, आमच्या टीमने 19 वेगवेगळ्या प्रजातींच्या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या 353 व्यक्तींची नोंद केली. आम्ही हिंद महासागरातील ‘बॉटलनोज डॉल्फिन’, हिंद महासागर ‘हंपबॅक डॉल्फिन’, ‘स्पिनर डॉल्फिन’, ‘स्पॉटेड डॉल्फिन’ आणि ‘शॉर्टफिन पायलट व्हेल’ पाहिले. हे भारताच्या पश्चिम किनारपट्टी आणि ‘आंग्रिया बँक’ दरम्यान पाहिले.
 
 
महाराष्ट्र आणि पश्चिम किनारपट्टीला ‘आंग्रिया बँक’चे ‘कोरल’ काय सेवा देतात, हा प्रश्न सागरी जैवविविधता आणि विपुलतेपेक्षाही अधिक लक्षवेधी आहे. बहुतेक लोक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ‘कोरल रीफ’कडे पाहतात. परंतु, या सजीव कोरलने तयार केलेल्या जैविक संरचनेमध्ये मासे आणि रीफ-संबंधित जीवांचे निवासस्थान असते. याशिवाय, ‘कोरल’ वातावरणातील कार्बन शोषून त्यांचे सांगाडे तयार करतात आणि सर्वात मोठ्या आकाराचे ‘कार्बन सिंक’ म्हणून काम करतात. त्यांनी बांधलेली गुंतागुंतीची रचना मुंबईतील गगनचुंबी इमारतींसारखी आहे. ‘झुअन्थेले’ नावाच्या ‘कोरल’ टिश्यूच्या आत राहणार्‍या सहजीवन शैवालसोबत काम करते आणि ‘कोरल’ एक अत्यंत क्लिष्ट आणि विलक्षण स्थापत्य तयार करते आणि हजारो रीफ माशांना आणि संबंधित ‘इनव्हर्टेब्रेट्स’ना घर देते.
 
 
 
आन्ग्रीया5
 
 
‘आंग्रिया बँक’ हे भारत लगतच्या समुद्रांमधील जैवविविधता ‘हॉटस्पॉट्स’पैकी एक आहे. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि ‘बायोस्फीअर रिझर्व्हज’सारख्या संरक्षित क्षेत्रांप्रमाणे सागरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी सागरी संरक्षित क्षेत्रे महत्त्वाची आहेत. मूलत: संवर्धनासाठी मानवी क्रियाकलाप प्रतिबंधित आहेत. हे क्षेत्र धोक्यात आलेल्या आणि दुर्मीळ सागरी प्रजातींचे संरक्षण करू शकतात आणि त्यांना पुनर्प्राप्त करण्यात आणि वाढण्यास मदत करू शकतात. विविध प्रजातींच्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या अधिवासांचे संरक्षण करण्यात ‘आंग्रिया बँक’ अग्रेसर आहे. अशाप्रकारे ‘आंग्रिया बँके’ला ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्याने, अतिमासेमारी, समुद्राचे वाढते तापमान आणि खनिज उत्खननाचे धोके कमी केले जाऊ शकतात आणि ते हवामान बदलाविरुद्ध विमा प्रदान करू शकते.
 
 
‘स्पिलओव्हर’ प्रभावाद्वारे उपलब्ध माशांच्या साठ्याला चालना देऊ शकते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अनेक उपेक्षित मच्छीमारांची उपजीविका सुरक्षित करण्यात मदत होऊ शकते. शेवटच्या मोहिमेदरम्यान, आम्ही जे पाहिले ती फक्त एक झलक होती. कारण, ‘आंग्रिया बँके’चे एकूण क्षेत्रफळ मुंबईइतके मोठे आहे आणि आम्ही दादरपेक्षा कमी क्षेत्राचे सर्वेक्षण केले असे असले, तरी ‘आंग्रिया बँक’ हे जैवविविधतेचे ‘हॉटस्पॉट’ आहे आणि अनेक मोहिमा झाल्या असूनही, अनेक क्षेत्रांचा अद्याप शोध झालेला नाही.
 
 
किनार्‍यापासून दूर स्थित असल्याने, सामान्यतः किनार्‍यालगत वापरल्या जाणार्‍या होडीने प्रदेश मुक्तसंचार करणे कठीण आहे.
हा प्रदेश किनारपट्टीपासून 60 नॉटिकल मैलांवर अस्तित्वात आहे. हे लक्षात घेता, भारत सरकार या प्रदेशाचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी ‘भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972’ अंतर्गत तरतुदींचा लाभ घेऊ शकत नाही. प्रादेशिक जल, महाद्वीपीय शेल्फ, विशेष आर्थिक क्षेत्र आणि इतर ‘सागरी क्षेत्र कायदा (सागरी क्षेत्र कायदा), 1976’ तथापि, ‘कलम 7(4)(व)’ आणि ‘7(6)(र)’ अंतर्गत केंद्र सरकारला समुद्री पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान करते. भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्रामध्ये भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व अधिकार क्षेत्रांपैकी किमान दहा टक्के संरक्षित करणे, यासाठी जैवविविधता आणि समुद्राच्या कायद्याअंतर्गत बांधील आहे. सोबतच संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार बांधील आहे.
 
 
आज ‘रीफ इकोसिस्टम’वर येणारा प्रचंड दबाव लक्षात घेतला पाहिजे. मासेमारी आणि खनिज आणि तेल शोध यासारख्या अनियंत्रित क्रियाकलापांपासून ‘कोरल रीफ’ संबंधित वनस्पती आणि प्राणी यांना धोका आहे. या परिसंस्थेचे रक्षण करण्याची ‘न भूतो न भविष्यति’ गरज निर्माण झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे, ऑगस्ट 2019 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2011 चौ.किमी ‘आंग्रिया बँक’ संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले. सध्या हा प्रस्ताव केंद्रात परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संवर्धन समुदायांच्या पाठिंब्याद्वारे आणि सार्वजनिक सहभागाने महाराष्ट्राच्या अद्वितीय वारशाचे संरक्षण करणे शक्य आहे.
 
 
आपण या क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सर्व काही केले पाहिजे. कारण, या पाण्याखालील क्षेत्राला केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही, तर त्याचे जैविक महत्त्वदेखील आहे. मोठ्या ट्यूना आणि शार्कने पाण्याखालील खडकांवरून रेंगाळत असताना आम्ही ‘मोरे ईल’, ‘स्कॉर्पिओनफिश’, ‘रेसेस’ आणि अक्षरशः हजारो माशांच्या देशात एलियन होतो.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121