(छाया - प्रथमेश देसाई)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्समधील बर्न्ट आयलंड या बेटावर पावसाळी हंगामात समुद्र पक्षी आपली घरटी बांधतात (vengurla rock sea bird nesting). हे बेट वेंगुर्ला बंदराच्या वायव्य टोकाच्या पश्चिम दिशेकडे १४ किमीवर असलेल्या द्वीपसमूहामधील एक आहे (vengurla rock sea bird nesting). या द्वीपसमूहामध्ये उत्तर-दक्षिण पाच किमी आणि पूर्व-पश्चिम १.६ किमी पसरलेल्या समुद्रातील २४ छोटेखानी बेटे आहेत (vengurla rock sea bird nesting). या द्वीपसमूहावरील प्राणीजगतासंबंधी माहिती मिळवण्यासाठी ए. ओ. ह्यूम यांनी साधारण १८७५ सालच्या सुमारास या ठिकाणाला भेट दिली होती (vengurla rock sea bird nesting). त्यावेळेस बरेच समुद्रपक्षी व पाकोळ्या (स्विफ्टलेट) पाहिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. १९३८ साली अब्दुल अलींनी भेट देऊन येथे समुद्री पक्ष्यांची सुरय, पारवे आणि सागरी पाकोळ्यांची वीण पाहिली होती (vengurla rock sea bird nesting). त्यानंतर लेनार नामक शास्त्रज्ञाने दि. ९ सप्टेंबर १९९७ रोजीच्या त्याच्या भेटीत १८ तपकिरी नॉडिज (ब्राऊन नॉडिज) पाहिले. दि. ६ जून २००१ रोजी भाऊ काटदरे यांनी तिथे भेट दिली होती व जवळजवळ ८०० लगाम सुरय (ब्रीडल्ड टर्न्स), ३०० मोठे तुरेवाले सुरय (ग्रेट क्रेस्टेड टर्न्स), १५० गुलाबी सुरय (रोझीयेट टर्स) आणि पाच लहान तुरेवाले सुरय (लेसर क्रेस्टेड टर्न्स) इथल्या खडकांवर पाहिल्याचा अहवाल दिला. त्यानंतर डॉ. सतीश पांडे यांनी तिथे सुरय पक्ष्यांच्या (टर्नच्या) आठ प्रजातींची नोंद केली. साधा सुरय (कॉमन टर्न), गुलाबी सुरय (रोझीयेट टर्न), पांढर्या गालाचा सुरय (व्हाईट चीक्ड टर्न), लगाम सुरय (ब्रीडल्ड टर्न), धुरकट सुरय (सुटी टर्न), मोठा तुरेवाला सुरय (ग्रेट क्रेस्टेड टर्न), लहान तुरेवाला सुरय (लेसर क्रेस्टेड टर्न), भारतीय नदी सुरय (इंडियन रीव्हर टर्न)
लेनारने वेंगुर्ला रॉक्स इथल्या सुरय पक्ष्यांचा परत आढावा घेतला. त्याने १९८८-८९ ते १९९७-९८ या काळात जानेवारी, फेब्रुवारी, जुलै आणि नोव्हेंबर हे महिने सोडून सर्व महिने आणि सर्व ऋतू घेऊन या ठिकाणी १२ वेळा भेट दिली. ऑगस्ट १९९८ साली त्याला बेटाच्या, वार्याच्या विरुद्ध दिशेकडे १५ हजार सुरय पक्ष्यांचा प्रचंड थवा दिसला. त्याने म्हटले आहे की, याशिवाय बेटाच्या समुद्राकडच्या कमी उतार असलेल्या बाजूला दहा हजार सुरय (टर्न) विखुरलेले होते. पण, त्यावेळी त्यांना प्रजातीनिहाय मोजमाप शक्य झाले नाही. जवळजवळ दहा हजार गुलाबी सुरय (रोसियेट टर्न्स), तीन हजार लगाम सुरय (ब्रीडल्ड टर्न्स) आणि दोन हजार मोठ्या तुरेवाल्या सुरय (लार्ज क्रेस्टेड टर्न्स) पक्ष्यांची १९८८ सालच्या नैऋत्य मोसमी पावसाळ्यात बेटाच्या किनार्याच्या बाजूला वीण झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. याच भेटीत त्यांना दहा लहान तुरेवाले सुरय (लेसर क्रेस्टेड टर्न), धुरकट सुरय (सुटी टर्न), 50 पेक्षा जास्त मोठे तुरेवाले सुरय (ग्रेटर क्रेस्टेड टर्न) आणि कमीत कमी तीन तरी सॅण्डवीच सुरयसुद्धा (सॅण्डविच टर्न) दिसले. काटदरे आणि सहकार्यांच्या चमूला २००४ साली ८०० लगाम सुरय (ब्रीडल्ड टर्न) व त्यांची अंडी त्या बेटावर सर्वत्र आढळली. याशिवाय त्यांना ३०० मोठे तुरेवाले सुरय (ग्रेटर क्रेस्टेड टर्न्स) व त्यांची १७ अंडी मिळाली. पाच छोटे तुरेवाले सुरय (लेसर क्रेस्टेड टर्न्स) आणि १५० मोठे तुरेवाले सुरय (ग्रेटर क्रेस्टेड टर्न्स) दिसले.
वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहातील खडक तसे ओसाड आहेत. मात्र, त्यातील भेगा आणि फटींमध्ये गवत आणि झुडुपे वाढतात. यातले प्रमुख गवत म्हणजे सिम्बोपोगॉन (गवती चहासारखी प्रजात) आणि इकडेतिकडे विखुरलेले कुर्डु आणि झारसी या गवत प्रजाती सुरय (टर्न) आणि इतर पक्ष्यांच्या पिल्लांना आश्रय देतात. या बेटांवरील समुद्रपक्षी जगताचा फारसा अभ्यास झालेला नाही. कारण, पावसाळ्यात या पक्ष्यांची वीण होत असल्याने त्याठिकाणी पोहोचणे सहजसोपे नाही. अशावेळी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सिंधुदुर्गातील काही तरुण या बेटांवर समुद्र पक्षीनिरीक्षणाच्या सहल घेऊन जातात.
- अक्षय मांडवकर