कल्याण खाडीत आढळला अॅलीगेटर जार; स्थानिक जलीय जैवविविधता धोक्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |
fish _1  H x W:


अॅलीगेटर गार हा मासा भारतात आढळत नाही.

मुंबई (प्रतिनिधी) - कल्याण शीळजवळ असलेल्या देसाई खाडीत विदेशी अॅलीगेटर गार प्रजातीचा मासा आढळून आला. खाडीत मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला हा मासा काही वेळाने मृत पावला. अॅलीगेटर गार हा मासा भारतात आढळत नाही. विदेशी प्राण्यांच्या तस्करींच्या माध्यमातून तो पाळण्यासाठी भारतात आणला जातो. हा मासा आक्रमक असल्याने स्थानिक जलीय जैवविविधतेसाठी तो धोकादायक आहे. 
 
 
मलंग गडाच्या डोंगरपट्टीतून वाहत येणारी मोथली नदी ही पुढे देसाई खाडी म्हणून ओळखली जाते. देसाई खाडीत गोडय़ा आणि खाऱ्या पाण्याचा संगम आढळून येतो. या खाडीत गुरुवारी धनाजी भोईर हे मासेमारी करीत होते. त्यांनी मासे पकडण्यासाठी जाळे टाकले असता त्यांच्या जाळ्य़ात एक मोठा मासा सापडला. त्याचे तोंड मगरीसारखे असल्याने भोईर यांना हा मासा वेगळा वाटला. सुरूवातीला काही काळ हा मासा जिंवत होता. त्यानंतर तो मृत पावला. हा मासा अॅलीगेटर गार असल्याचे समोर आले. महत्त्वाचे म्हणजे या माशाचा अधिवास भारतात आढळत नाही. त्यांचा नैसर्गिक अधिवास मिसिसिपी रिव्हर व्हॅली, दक्षिण अमेरिका आणि मेक्सिकोच्या आखाती राज्यांमध्ये आहे. 
 
 
 
विदेशी पाळीव प्राण्यांच्या व्यापाराअंतर्गत अॅलीगेटर जार माशाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या माशाला त्याच्या नैसर्गिक अधिवासातून पकडून जगभरात त्यांची तस्करी होते. भारतातही हा मासा पाळला जातो. साधारणे हा मासा १० फूट लांब आणि १५९ किलोपर्यंत वाढतो. त्यामुळे पूर्ण वाढ झाल्यावर त्याला पाळणे मुश्किलीचे होते. त्यामुळे अशा परिस्थितीतूनच कोणीतरी या माशाला देसाई खाडीत सोडल्याची शक्यता आहे. परंतु, हा मासा आक्रमक असून जलीय परिसंस्थेतील कोणतेही जीव तो फस्त करु शकतो. त्यामुळे आपल्याकडील स्थानिक जलीय जीवांना या माशापासून धोका आहे. अशा परिस्थितीत हा मासा देसाई खाडीत मोकळ्या सापडणे हे जैविकदृष्ट्या धोक्याचे आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@