मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आर्वी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे आणि कल्याणकारी योजनांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाशी युती करावी आणि कोणाशी नाही, हे ठरविण्याचे अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समितीला आहेत. इतर कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आमची भूमिका या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आहे. पण, काही जागांवर, जेथे शक्य होणार नाही, तेथे आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ११ जून रोजी दिली.
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या माध्यमातून करीत असून, भविष्यात 52 टक्के हरितऊर्जानिर्मितीचे लक्ष्य गाठणे, ही अशक्य अशी बाब नाहीच. खरं तर निर्धारित कालावधीपेक्षा हे उद्दिष्ट लवकरच साध्य केले जाईल, यादृष्टीने फडणवीस सरकारने पाऊले उचललेली दिसतात.
“राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सातत्याने अपमान करतात. जनतेने त्यांना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल,” असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला. त्याचप्रमाणे, “बिहारसह आगामी विधानस
रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमिटोमो रिअॅलिटी अँड डेव्हलपमेंट (जपान) व ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बीकेसीतील 3 महत्त्वाच्या भूखंडांचे वाटपपत्र आज प्रदान करण्यात आले. या व्यवहारातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) एकूण ₹3840.49 कोटींचे उत्पन्न मिळाले असून, या माध्यमातून सुमारे 15,000 हाय-टेक नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.
(Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
( Devendra Fadnavis on terrorism ) मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
(CM Devendra Fadnavis Gauravshali Maharashtra program) “मी तीनवेळा मुख्यमंत्री झालो. आधी सलग पाच वर्षे आणि त्यानंतर 72 तास. त्यामुळे सर्वांत अधिक आणि सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. तर सर्वाधिक वेळा आणि सर्वांत कमी वेळ म्हणजे 72 तास उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. पण, महाराष्ट्रात सध्या असलेल्या समीकरणांची मुहूर्तमेढ त्या 72 तासांच्या काळातच रोवली गेली होती,” अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. 3 मे रोजी केली.
( Chief Minister's Relief Fund Cell help )बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. मात्र, गावकऱ्यांच्या तत्परतेने, सरपंचाच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या त्वरित मदतीमुळे या मुलीचे प्राण वाचले. अवघ्या दोन तासांत १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या मदतीमुळे हवालदिल झालेल्या मुलीच्या कुटुंबाला आधार मिळाला.
( Chief Minister Devendra Fadnavis ramnavmi programe ) “प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावी, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले. मानखुर्द येथे ‘संजोग सोसायटी’च्यावतीने आयोजित संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
( Devendra Fadnavis on action mode Instructions to all departments work details on the website by May 1 ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात ‘१०० दिवसांसाठीचा कृती आराखडा’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली. त्यामुळे या कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. येत्या दि. १ मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर संकल्पित केलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
( CM devendra fadnavis on the discussion of final budget week proposal ) कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. पण भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवार, २५ मार्च रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात नागपूरातील राजभवन येथे दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता महायुतीच्या एकूण ३९ आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेत मंत्रिपदाचा विस्तार करण्याचा निर्णय हाती घेतला आहे.
Devendra Fadnavis 3.0 cabinet महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली. त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत कारभार स्वीकारला आहे. यामध्ये जातीय सलोखा जपत कोणताही भेदभाव न करता मंत्रिपदे दिली आहेत.
Devendra Fadnavis 3.0 cabinet मध्ये एकूण २५ नवनिर्वाचितांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे आता महायुतीच्या देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात भाकरी फिरवली असे म्हणता येईल. कारण आता महायुतीतील एकूण २५ नवनिर्वाचित आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची देेदीप्यमान कारकीर्द
बदलापूरच्या एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एसआयटी' गठीत केली आहे.
पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवडकरांची जीवनशैली उंचावण्यादृष्टीने महत्त्वपूर्ण विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे महायुती सरकारकडून पिंपरी-चिंचवडकरांना ‘मान्सून गिफ्ट’ मिळाले आहे.
महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाची कारकीर्द पाहिली आहे. मीरा-भाईंदर देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द विसरू शकत नाही एवढा निधी त्यांनी मीरा-भाईंदरसाठी दिला आहे. मीरा-भाईंदरच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मीरा-भाईंदरचे चित्र बदलले त्याचे खरे शिल्पकार फडणवीसच आहेत, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी भाजपा मीरा-भाईंदर शहर जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत केले.
देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना राज्यात दुसरे काही दिसत नाही. देवेंद्र द्वेषाने राऊत आणि ठाकरे पछाडले आहेत, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आमदार दरेकर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना राज्यात दुसरे काही दिसत नाही.
मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एकमध्ये आणण्याचा निर्णय मंगळवार, दि. ३० जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयामुळे ६० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली निघणार असून, संबंधित जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घे
विकतचे दुखणे लवकर बरे होत नाही असे म्हणतात. 100 कोटींच्या वसुलीचे प्रकरण थंड होते न होते, तोच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असेच विकतचे दुखणे अंगाला लावू घेतले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. 22 जुलै रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. पेणमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केला असता, त्याला तत्काळ प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला. फडणवीस हे सातत्याने दिव्यांगांच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील सर्वाधिक काळ हा चहाचे फुरके मारण्यात जातो. मुंबईतील आल्हाददायक वातावरणही त्यास कारणीभूत. पण, यंदाचे अधिवेशन मात्र त्याला अपवाद ठरले. महत्त्वाकांक्षी योजनांचा ‘पाऊस’ पाडतानाच सत्ताधार्यांनी पुरवणी मागण्यांचाही विक्रम केला. विरोधकांच्या ध्यानीमनी नसलेल्या एकास एक योजनांची घोषणा करीत महायुतीने विधानसभेच्या विजयाची वाट सुकर केली. त्यानिमित्ताने या अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा...
राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचा विकास झपाट्याने होत चालला आहे. 2017 च्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मी नाशिकला दत्तक घेत असून वार्यावर सोडणार नाही, असा शब्द त्यांनी नाशिककरांना दिला होता.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेला काँग्रेसने केवळ विरोधाला विरोध याच हेतूने विरोध करण्याचे पाप करत आहे. तांत्रिक मुद्द्यांची पूर्तता केली असतानाही, राज्यातील सुमारे 3.50 कोटी महिलांना याचा लाभ मिळेल, हे लक्षात आल्यानेच, महायुती सरकारला त्याचा फायदा मिळू नये, या राजकीय हेतूने, विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध करण्याचे ठरवले आहे.
सुशिक्षित, प्रज्ञावंत, लेखक, संपादक आणि मुंबईतल्या मातीतीला खेळ खेळणारा एक खेळाडू, असा सर्वगुणसंपन्न असा चेहरा आपण मुंबई पदवीधर निवडणुकीत दिला आहे, असे विधान वांद्रे येथील संकल्प मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी किरण यांचे नाव का सुचवले, याचे गमक काही दिवसानंतर कळले. कारण ते वरळी विधानसभा मतदारसंघातून येतात, असा उपरोधिक टोलादेखील शेलार यांनी विरोधकांना लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis BJP) लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर बुधवार, ५ जून रोजी पत्रकार परिषद घेतली. "महाराष्ट्रात भाजपला जो पराभव सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो आहे. मला सरकारमधून मोकळं करावं. मला फक्त पक्षाचं काम करायचं आहे," अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे यावेळी केली.
डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील रासायनिक कंपनीत स्फोट झाला होता. या अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांच व पंचवटी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईतून अटक करण्यात आली असून मालती मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनी इंडी आघाडीच्या दादर छत्रपती शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेनंतर 'जमलेल्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो' म्हणणे वारंवार टाळत आले आहेत, अशी माहिती Devendra Fadnavis TV9 Interview मध्ये दिली
उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवावे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १० एप्रिल रोजी केला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कर्जमधील (रायगड) १३ वर्षीय वेदांत ठाकरेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'सुपर हिरो' ठरले आहेत. एका कार्यकर्त्यामार्फत फडणवीस यांना वेदांतविषयी माहिती कळल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातील यंत्रणा कामाला लावली आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर करून ८ हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता गाठण्यासाठी टेंडर निश्चित करण्यात आली असून हे देशातील विक्रमी काम आहे. संबंधित कंपन्यांना इरादापत्रे दिल्यानंतर त्यांच्याकडून १८ महिन्यात प्रकल्प उभारणी अपेक्षित असून त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा बारा तास वीज नियमितपणे मिळेल, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे काही दुर्योधन नाही की, उठबसल्या त्यांना संतापच येतो. ते शांत आहेत, संयमी आहेत. जरांगेंच्या भाषणाने ते कधी उत्तेजित होताना दिसत नाहीत. आपल्याविरुद्ध हा राजकीय डाव कोण खेळतो आहे, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. ते कोण आहेत, हे आम्ही सांगावे म्हणजे आमचे अतिशहाणपण प्रगट केल्यासारखे होईल. राजकीय बुद्धीबळाचा हा खेळ चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हे लक्षात येत नाही की, या खेळातील आपण एक फक्त प्यादे आहोत.
स्वत:कडे सत्ता नसल्यावर जाती धर्मांमध्ये दंगली पेटवण्याचं काम सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. तसेच ५० वर्षांनंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर तुतारी वाजवायला जाणाऱ्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी करुन दाखवलं आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. मनोज जरांगेंकडून सतत राज्य सरकारवर करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी आता प्रत्युत्तर दिले.
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी केलेल्या घोषणांची वचनपूर्ती केल्याबद्धल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काळाचौकी अभ्यूदय नगर येथील शहीद भगतसिंग मैदान येथे 'धन्यवाद देवेंद्रजी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर आणि सांगली भागात पूर व्यवस्थापन प्रणाली राबवून पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
अजित पवार गटाच्या मेळाव्यातील बॅनरवर माजी मंत्री नवाब मलिक यांचे छायाचित्र लागल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी भूमिका पक्की आहे. जी माझी भूमिका आहे तीच भाजपाची भूमिका आहे. त्यापासून आम्ही तसूरभरही दूर झालेलो नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा संमेलन हस्तांतरण सोहळा पुणे येथे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले,”महाराष्ट्रात ‘कट्यार पाठीत घुसली’ हे २०१९ साली नाट्य घडले. त्यानंतर आम्ही देखील २०२२ साली ‘आता होती गेली कुठे’ हे नाट्य केले”, असे म्हणत नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
झपाट्याने वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून, सुरक्षा व्यवस्थेतही अनेक त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येनुसार पोलीस दलाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात ४, तर ग्रामीण भागात १० किमीवर पोलीस ठाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाचा अधिकारी करणार असून श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केला
ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई उपनगरात पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून 'नमो ११ सुत्री कार्यक्रमा'चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगल प्रभात लोढा म्हणाले, नमो ११ सुत्री कार्यक्रम म्हणजे विकास पर्वाची नांदी असल्याचे मंत्री लोढा म्हणाले.
दसरा मेळावानिमित्त उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केले. यावेळी शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, असा घणाघात महाराष्ट्र भाजपने उबाठा गटावर केला.
कंत्राटी नोकर भरतीवरून जनसामान्यांची, बेरोजगार तरुणांची उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिशाभूल केली आहे. यांचे हे पाप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडं केले असून उद्धव ठाकरे, शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी, असा घणाघाती हल्लाबोल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज मुंबई भाजपा दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालय, गिरगांव येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश आंदोलनावेळी केला.