उद्धव ठाकरेंना 'हिंदू' शब्द उच्चारायला लाज वाटते!

देवेंद्र फडणवीस यांची टीका

    17-May-2024
Total Views | 166

Devendra Fadnavis
 
 
मुंबई (Devendra Fadnavis TV9 Interview) : उद्धव ठाकरेंनी इंडी आघाडीच्या दादर छत्रपती शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेनंतर 'जमलेल्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो' म्हणणे वारंवार टाळत आले आहेत. त्यांना हिंदूंनो म्हणायची लाज वाटू लागली आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुस्लीमांना घाबरवून त्यांची मते घ्यायची पण त्यांच्यासाठी काहीच करायचे नाही, अशी यांची अवस्था आहे, अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली. मुस्लीम मतांचे लांगूलचालन करून फक्त मते मिळवण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे, उद्धव ठाकरेंनी एकदाही हिंदू हा शब्द आत्ताच्या भाषणांमध्ये का घेतला नाही, असा सवालही त्यांनी विचारला. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोडशोवर टीका करणाऱ्यांचाही त्यांना समाचार घेतला. "घाटकोपर दुर्घटनेला उद्धव ठाकरेंचे सरकारच जबाबदार आहे. भावेश भिंडे या त्यांच्याच पक्षात आहे. त्याला बेकायदेशीररित्या परवानग्या कशा मिळाल्या? त्याच्यावर कारवाई का झाली नाही? त्याला कुणाचा आशीर्वाद होता?,"  असा सवालही त्यांनी उपस्थितत केला. उद्धव ठाकरे म्हणतात मोदींचा रोड शो का झाला? तर त्यांनी सांगावं, उद्धव ठाकरेंनी केजरीवालांना का बोलावलं, पवारांना का बोलावलं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर पवारांच्या सभा चालू शकतात मग मोदींच्या सभा का नाही चालणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंसोबत तेव्हाही मोदींच्या १३ सभा झाल्या. 
 
"उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर वक्तव्ये केली आहे. मी जर करायला सुरुवात केली तर तोंड दाखवायची जागा नाही राहणार नाही. मी देशात आणि राज्यातील एक प्रमुख नेता आहे. त्यामुळे मी माझा स्तर हा सोडणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ही निवडणूक दिल्लीची निवडणूक आहे की गल्लीतील निवडणूक आहे. हे देखील कळायला हवं, असेही फडणवीस म्हणाले. "उद्धव ठाकरेंच्या एक गोष्ट लक्षात आली की मराठी हा हिंदूही आहे. त्यांचे मतदान कमी झाले हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना कळून चुकलं की, मराठी मतदारांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी मुस्लीम मतांकडे आपला मोर्चा वळवला.",अशी टीका फडणवीसांनी त्यांच्यावर केली.
  
"उद्धव ठाकरेंच्या प्रचार रॅलीत ९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी स्टार प्रचारक दिसतो. त्यांच्या पक्षाची लोकं मशालीचा दुपट्टा घालून अल्लाहू अकबरचे नारे देतात. टीपू सुलतान जयंती साजरी करतात. त्यांच्या रॅलीत पा हे चुकीचे नाही का? बाळासाहेबांचे विचारांना तिलांजली नाही का? जेव्हापासून इंडी आघाडीची सभा घेतल्यानंतर त्यांनी हिंदू हा शब्द सोडून दिला. त्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्या पायाशी लोळण्यासाठी मी आलो आहे. त्यांच्यापुढे जर मी हिंदू शब्द उच्चारला तर मला मतं मिळतील का? हा प्रश्न त्यांना पडला आहे. बाळासाहेबांचे विचार सोडणे म्हणजे काय? नकलीपण जे आलं ते हेच आहे.", अशी घणाघाती टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121