श्री शनेश्वर देवस्थानाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होणार

    19-Dec-2023
Total Views | 56
Inquiry corruption of Shree Shaneshwar Temple

महाराष्ट्र :
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाचा अधिकारी करणार असून श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेत शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर संस्थान येथे विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रकार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून विधान परिषदेत मांडला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे तसेच सभागृहात पारित झालेल्या कायद्याची अमलबजावणी करू अशी माहिती दिली.

शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाने अनधिकृतपणे १८०० कामगारांची भरती केली. ही संख्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त असून यातील शेकडो कामगारांना घरी बसून पगार दिला जात आहे. मंदिराच्या चौथाऱ्यावर दर्शनासाठी ५०० रुपयांची बनावट पावती छापून २ कोटी रुपये उकळण्यात आले. देवस्थानला मिळालेले दान एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. २४ तास वीज पुरवठा असताना महिन्याला ४० लाख रुपयांचे डिजेल जाळण्यात आले. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी २० कोटींचा निधी देण्यात आला होता, तथापि, ५० कोटी खर्च करूनही अद्यापही ५० ते ६० टक्के काम शिल्लक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

२०१८ मध्ये भाजप सरकारने श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ हा कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला होता. त्याची तातडीने अमलबजावणी करावी अशी विनंती श्री बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव दर्जाचा अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
अग्रलेख
जरुर वाचा
पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121