
पुणे : देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना स्मरण करून, त्यागाचा दिवा पुन्हा एकदा उजळवण्यासाठी पिंगोरी,ता. पुरंदर गावाने कारगिल विजय दिन विशेष पद्धतीने साजरा केला. ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढत ची कारगिल युद्धात हुतात्मा झालेले वशहीद शंकर शिंदे अमर रहे'च्या घोषात गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.
याप्रसंगी शहीद स्मारकाभोवती फुलांची सजावट करण्यात आली होती. अमर जवान स्मारकाला पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी छाया शिंदे, आणि शहीद रमेश शिंदे यांच्या पत्नी नंदा शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमात लेफ्टनंट कर्नल सविता शिंदे यांनी "पिंगोरी ही वीरांची भूमी आहे," असे गौरवोद्गार काढत, शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या त्यागालाही वंदन केले. माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शहीद शिंदे कुटुंबीयांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
धनंजय शिंदे, रूपेश यादव, दत्तात्रेय शिंदे, जीवन शिंदे, नीलेश शिंदे, तेजस शिंदे, मयूर शिंदे, सोहेल इनामदार, प्रकाश शिंदे आदींच्या प्रयत्नातून कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन झाले. सूत्रसंचालन मराठी अभिनेता विनोद शिंदे यांनी केले, तर सरपंच संदीप यादव यांनी आभार मानले.
कार्यक्रमात भाग्यश्री शिंदे, राहुल शिंदे, पल्लवी भोसले, तुकाराम शिंदे, अरुण शिंदे, राजेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, जयसिंग शिंदे, महादेव गायकवाड, भानुदास शिंदे, रामभाऊ शिंदे, सत्यवान भोसले यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.