नागपूर : (Devendra Fadnavis) जो जिता वही सिकंदर. पराभव झाल्यानंतर तो स्विकारता आला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
बिहारच्या महिलांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी बिहार विधानसभेच्या निकालावर दिली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “जो जिता वही सिकंदर. पराभव झाल्यानंतर तो स्विकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजे. आत्मपरिक्षण केले पाहिजे. पण आमच्या विरोधी पक्षांना आत्मपरिक्षण करणे मान्य नाही.”
“बिहारमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती. विरोधकांचे सरकार असताना त्यांनाही ती संधी होती. पण त्यांनी योजना राबवल्या नाही. आम्ही केलेल्या योजना लोकांना आवडल्या आणि त्यांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय? राहुल गांधी जोपर्यंत आत्मपरिक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते धुळीसच मिळणार आहेत," असे ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत पार्थ पवार प्रकरणात चर्चा होण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, "मला तसे वाटत नाही. राज्यातील काही मुद्यांवर त्यांनी भेट घेतलेली आहे, असे मला वाटते."
"विरोधी पक्ष एकत्रित लढतो की, स्वतंत्र लढतो यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास असून जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण कसे लढतो हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मुंबईत महायुतीच निवडून येईल," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....