अहमदाबाद : (Bullet Train Project) मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमध्ये नागरी व ट्रॅक कामांच्या महत्त्वाच्या भागांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असून, अनेक टप्पे पूर्ण झाल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉरपोरेशन लिमिटेडने दिली आहे. (Bullet Train Project)
एकूण ५०८ किमी लांबीच्या भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची (Bullet Train Project) अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून एनएचएसआरसीएल कार्यरत आहे.
एनएचएसआरसीएलने सांगितले की, हा प्रकल्प सातत्याने नवीन उंची गाठत आहे. कॉरिडॉरवर ३२६ किमीहून अधिक वायाडक्ट (उड्डाणपुलांचे) बांधकाम पूर्ण झाले आहे. या मार्गावर १७ नदीपूल आणि १० स्टील पूल बांधून झाले आहेत, तसेच २०६ किमीपेक्षा जास्त लांबीवर चार लाखांपेक्षा अधिक नॉईज बॅरिअर्स (ध्वनिरोधक भिंती) बसविण्यात आल्या आहेत. याशिवाय, हाय-स्पीड कॉरिडॉरवर सुमारे ४०० किमी पिअरचे (खांब) बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरत जिल्ह्यातील महत्त्वाच्या टप्प्यात वायाडक्ट, सिमेंट काँक्रीट ट्रॅक बेड, रेल्वे ट्रॅक बसविणे आणि नॉईज बॅरिअर्सची उभारणी ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. २०६ ट्रॅक किमीपेक्षा अधिक लांबीवर ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले असून, सुमारे ५० किमी वायाडक्टवर २,००० हून अधिक ओव्हरहेड इक्विपमेंट उभारण्यात आले आहेत. (Bullet Train Project)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सात डोंगरी बोगद्यांवर खोदकामाचे कामही सुरू आहे. स्थानकांच्या दृष्टीने पाहता, गुजरातमधील स्टेशन सुपरस्टक्चर कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन उंचावरील स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील भूमिगत स्टेशनचे बांधकामही वेगाने सुरू आहे. भारताचा पहिला बुलेट ट्रेन कॉरिडॉर असलेला हा प्रकल्प मुंबई आणि अहमदाबादला ३२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या हाय-स्पीड ट्रेनने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ही बुलेट ट्रेन गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधून धावणार आहे. प्रकल्पांतर्गत मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी १२ स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पात सुमारे ९० टक्के मार्ग हा एलिव्हेटेड आहे आणि त्याचे बांधकाम प्रामुख्याने ‘फुल स्पॅन लॉन्चिंग मेथड’ वापरून केले जात आहे. ही अनोखी तंत्रप्रणाली भारतात प्रथमच वापरली जात असून, या तंत्राचे प्रावीण्य मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचे स्थान निर्माण झाले आहे. (Bullet Train Project)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि.१५ नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देऊन भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरच्या बांधकाम प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बांधकामाधीन सुरत स्थानकाची पाहणी केली. सद्यस्थितीत संपूर्ण कॉरिडॉरचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी सुरत–बिलिमोरा हा ४७ किमीचा टप्पा मोठ्या प्रमाणावर पूर्णतेकडे असून, त्यातील सिव्हिल वर्क आणि ट्रॅक-बेड लायनिंगची कामे पूर्ण झाली आहेत. (Bullet Train Project)
सुरत–बिलिमोरा विभाग, जो साधारण ४७ किमी लांबीचा आहे. त्यामध्ये सर्व नागरी कामे आणि ट्रॅक-बेड अंथरण्याचे कार्य पूर्णत्वास पोहोचले आहे. सुरत स्थानकाची रचना ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शहराच्या हिरा उद्योगाच्या प्रेरणेतून करण्यात आली आहे. या स्टेशनमध्ये प्रशस्त प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे, किरकोळ व्यापार क्षेत्रे आणि येऊ घातलेल्या सुरत मेट्रो, शहर बस सेवा आणि भारतीय रेल्वेशी अखंड जोडणी उपलब्ध असेल. पंतप्रधानांची ही भेट भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. (Bullet Train Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.