Local Body Elections : मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीत फूट; काँग्रेसचा स्वबळाचा नारा

    15-Nov-2025   
Total Views |
Local Body Elections

मुंबई : (Local Body Elections) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसने नुकताच स्वबळाचा नारा दिला असून उबाठा आणि शरद पवार गटाचे टेन्शन वाढल्याचे दिसते.
 
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूका लढणार असल्याचे जाहीर केले. "मुंबई काँग्रेस कमिटी येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीची तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील युतीचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर सोडला आहे. परंतू, मुंबईत काँग्रेस २२७ जागांवर स्वतंत्र लढणार आहे," असे त्यांनी सांगितले. शिवाय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही यावर शिक्कामोर्तब केले. (Local Body Elections)
 
 
वास्तविक, नुकताच जाहीर झालेला बिहार विधानसभेचा निकाल पाहता काँग्रेसचा हा 'अति'आत्मविश्वास वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल. खरेतर, मनसे आणि उबाठा गट एकत्र येण्याची चाहुल लागल्यापासूनच काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली होती. कधीतरी एखादा नेता ओघाओघात स्वबळाची भाषाही करत होता. मात्र, आता रमेश चेन्निथला यांच्या वक्तव्यानंतर यावर शिक्कामोर्तबच झाले म्हणावे लागेल. (Local Body Elections)
 
आकडेवारी काय सांगते?
 
खरेतर, मनसे आणि उबाठा गटाची वाढती जवळीक पाहता काँग्रेसने हा निर्णय घेतला असावा. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या चार निवडणूकांची आकडेवारी पाहता काँग्रेसला स्वबळावर लढणे अवघड जाणार असे दिसते. (Local Body Elections)
 
हे वाचलात का ? : Devendra Fadnavis : जो जिता वही सिकंदर; पराभव झाल्यानंतर तो स्विकारता आला पाहिजे  
 
बीएमसी निवडणूकीचे वर्ष - काँग्रेसचे बलाबल
२०१७ - ३१
२०१२ - ५२
२००७ - ७५
२००२ - ६१
 
गेल्या चार निवडणूकांतील काँग्रेसचा हा उतरता आलेख पाहता यंदा मुंबई महापालिकेत काँग्रेसचा किती निभाव लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरते. वास्तविक, गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा ताबा होता. पण २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपने ८२ जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे या निवडणूकांमध्ये भाजपच्या आशा नक्कीच वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना पक्षफुटीचा दणका बसू शकतो. शिवाय काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीला नवे वळण येणार हे निश्चित आहे. शिवाय यावर उबाठा गट आणि शरद पवार गट काय भूमिका घेतात? हेही पाहणे औत्सुक्याचे असेल. (Local Body Elections)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....