Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर
बिहार निकाल लागला अन मनपा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाचा जोर वाढला
16-Nov-2025
Total Views |
मुंबई : (Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा झाला.तर दादर येथील पक्ष कार्यालयात भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी विजयोत्सव साजरा करत मुंबई महापालिकेचा संदर्भ देत मुंबईकरांचा आणि महायुतीचा महापौर विराजमान करूयात असे वक्तव्य केले अन भाजपची विकासात्मक रणनीती आणि वाटचाल सांगितली. ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक या चर्चेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.'मुंबईचा सेवक तोच नगरसेवक 'असे ट्विट पण केले होते.
गल्ली ते दिल्ली शतप्रतिशत भाजपा धोरण सांगताना महायुतीतील कुणावरही अन्याय होणार नाही हे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.तसेच पक्षाच्या नवीन संपर्क कार्यालयांचे उद्घाटन पण अग्रभागाने सुरू आहे. महिले मेळावे घेऊन पक्ष लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. (Bihar election)
दुसरीकडे महाविकास आघाडीत एकदमच शांतता पाहायला मिळत आहे. उबाठाचे उद्धव ठाकरे यांनी बिहार निवडणुकीत निवडून आलेल्यांच अभिनंदन करताना सभेला गर्दी न्हती ते विजयी झाले असे म्हटले. पण मनसे नेते राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते ती मत कुठ जातात ? हे मात्र ते सांगू शकणार नाहीत. बिहार निकालानंतर उबाठाचे अंबादास दानवे यांनी काँग्रेस वर बोलताना, 'काँग्रेस जागा अधिक मागते पण विजय मात्र कमी मिळतो अशी त्यांची मानसिकता आहे'अशी खोचक टीका केली होती.त्यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार प्रत्त्युत्तर देताना, 'महाराष्ट्रातील विषयावर नंतर बोलू राज्यात जागा वाटपाचा घोळ सर्वांनीच घातला होता.' असे मत व्यक्त केले.सध्या काँग्रेसने मुंबई मध्ये 'एकला चलो 'ची भूमिका घेताना ठाकरे बंधूंची युती स्पष्ट नाकारली आहे.यावरून मनसे नेते संदीप देशपांडे अन गजानन काळे यांनी काँग्रेसवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड अन उबाठा गटाच्या किशोरी पेडणेकर यांच्यात पण टीका टिपण्णी सुरू आहे.मतचोरीचे आरोप बिहार मध्ये सर्वत्र निष्प्रभ झाल्यावर आता महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या मुद्यावर मत मागायचे आणि नेमकी आघाडी कुणासोबत करायची ही स्थिती विरोधकांची झालेली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने मात्र यासर्वात शांत राहायची भूमिका घेतलेली दिसते आहे. ठाकरे बंधू की काँग्रेस हा पेच त्यांच्यासमोर आहे. (Bihar election)