मुंबई : मुंबई उपनगरात पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून 'नमो ११ सुत्री कार्यक्रमा'चे आयोजन ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत केले जाणार आहे. दरम्यान, नमो ११ सुत्री कार्यक्रम म्हणजे विकास पर्वाची नांदी असल्याचे मंत्री लोढा म्हणाले.
दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्यात नमो ११ सुत्री अंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम महाराष्ट्र शासन राबविणार आहेत, असेही पालकमंत्री लोढा म्हणाले. तसेच, मंत्री लोढा यांनी या कार्यक्रमासंदर्भात X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनहितासाठी 'नमो ११ सूत्री' कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली. तर पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात 'नमो ११ सूत्री कार्यक्रम' राबविणारा मुंबई उपनगर हा प्रथम जिल्हा ठरला.
मुंबई उपनगरातील या ठिकाणी होणार कार्यक्रमाचे आयोजन
नमो दिव्यांग शक्ती अभियान - मुलुंड
नमो कामगार कल्याण अभियान - चांदिवली
नमो आत्मनिर्भर ग्राम अभियान- वांद्रे (पश्चिम)
नमो दलित सन्मान अभियान -घाटकोपर (पूर्व)
नमो तीर्थ स्थळ सुधार अभियान -विलेपार्ले (पूर्व)
नमो आदिवासी स्मार्ट स्कूल अभियान - मागाठाणे-बोरीवली (पूर्व)
नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियान- मालाड (पश्चिम)
नमो सौर ऊर्जा कार्यालय अभियान - वांद्रे (पूर्व)
नमो शेत तळे अभियान - अंधेरी (पश्चिम)
नमो शहर सौंदर्यीकरण अभियान- कांदिवली (पूर्व)
नमो महिला सशक्तीकरण अभियान - कुर्ला (पूर्व)