मुंबई : गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी केलेल्या घोषणांची वचनपूर्ती केल्याबद्धल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काळाचौकी अभ्यूदय नगर येथील शहीद भगतसिंग मैदान येथे 'धन्यवाद देवेंद्रजी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मुंबईकरांच्या उर्वरित प्रश्नांची अपेक्षापूर्ती होणार असून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप विधानपरिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर व भाजप मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हौसिंगचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व राहिलेल्या उर्वरित प्रश्नांसाठी त्यांना मुंबईकरांच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांसह मुंबईतील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.