मुंबई : बहुजन विकास संघाचा ८वा वर्धापन दिन विद्याविहार येथील रोटरी क्लब सभागृहात संघाचे अध्यक्ष अरुण चौहान यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिलाल राजौरिया यांनी केले.
वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ पत्रकार बिरमसिंग कीर लिखित “मिशन एकता” या पुस्तकाचे प्रकाशन हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. संघाच्या आठ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी झालेल्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य व महिला-बालकांसाठी केलेल्या कार्यावर प्रबोधन झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन सदस्यांना संघात प्रवेश देण्यात आला.
कार्यक्रमाला संघाचे संस्थापक गंगादास वाल्मिकी, राष्ट्रीय प्रवक्ता नरेश भगवाने, प्रधान महासचिव नरेश बोहित, राष्ट्रीय सल्लागार अशोक बोयतकर, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सोनी चौहान, मुंबई महिला अध्यक्ष शीतल मंगवाना आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मीनाक्षी चौहान, गायत्री उज्जैनवाल, अँड. शोभा शेवाळे, लीना कजानिया, संजय चौहान, मदन गुहेर, राजेश चिंडालिया, राम वाल्मिकी, विक्रम गौहर, विनोद कजानिया, किसन सारसर, मनोज बनाफल यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सांगता नरेश बोहित यांच्या आभारप्रदर्शनाने व राष्ट्रगीताने झाली.