धामणी धरणाचे सर्व दरवाजे ५० सेमीने उघडले,सूर्या नदीला मोठा पूर

    22-Aug-2025
Total Views |

कासा, भागातील सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण भरले असून धरणाचे सर्व पाच ही दरवाजे बुधवारी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी ५० सेमीने उघडल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे.त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेच इशारा दिला आहे.

सतत दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाची पाणी पातळी वाढली असून ती ११८.६० मिटर झाली आहे. तर धामणी धरण १०० टक्के भरले आहे . धामणी धरणातून एकूण ८ हजार चारशे पंच्याहत्तर क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे .तर त्याखालील कवडास धरण जुलै महिन्यात च१०० टक्के भरले असून त्यामध्ये ६४.२० मिटर पाणी पातळी असून ते ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सूर्या नदीत एकूण १७ हजार तीनशे तेहतीस क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे .परिणामी नदी काठची भात शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे .धरण क्षेत्रात आता पर्यन्त ३ हजार २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सुर्या नदीला पूर आल्याने नदी काठची शेत जमीन पाण्याखाली जण्याची भिती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.