covid

इतक्या लवकर कोरोना बरा झाला? अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला अक्षय कुमारच्या हजेरीवर प्रश्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती. अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.

Read More

मुंबई महापालिकेचे लेखापरिक्षण होणार! ठाकरे गोत्यात येणार का?

२०२३ -२४ चा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५० हजार कोटींहून अधिक रुपयांचा होता. म्हणजेच गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची रक्कम कित्येक पट्टींनी जास्त मानली जाते. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ५० ते ७० टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच होतो. उर्वरीत खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो, असं ही सांगितले जातं. मा

Read More

‘कोविड’ महामारीतून जगाला तारणार्‍या वैद्यकीय संशोधनाचा नोबेल गौरव

या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस जगातील हजारो शास्त्रज्ञांच्या दृष्टीने सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्राचे ‘नोबेल’ पारितोषिक या दिवशी जाहीर झाले आणि वैद्यकीय क्षेत्रातील हजारो शास्त्रज्ञ ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण सर्वांच्या अपेक्षेसारखा आला. यावर्षी कॅटालिन कारिको आणि त्यांचे सहकारी ड्रू वेईसमन या दोघांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्याचे ‘नोबेल’ पारितोषिक जाहीर झाले. त्यानिमित्ताने जगाला कोरोना महामारीतून तारणारे या संशोधनाविषयी आणि या दोन पुरस्कार्थींच्या आजवरच्या आव्हानात्

Read More

नुकसान भरपाई ८ दिवसात न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसात न दिल्यास पिक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. सन २०२०-२१ मधील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही पिक विमा कंपन्यांकडून विलंब होत असल्याने त्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उप

Read More

राऊतांच्या नावाचा वापर करून सुजीत पाटकरांनी मिळवले ३३ कोटीचे कोविड टेंडर!

जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

Read More

६० लाखांची सोन्याची बिस्किट पालिका अधिकाऱ्यांच्या घशात!

एक काळ असा होता. जेव्हा राजेमहाराजे आपल्या आवडत्या सरदाराला बक्षिस म्हणून सोन्या - चांदीचे अलंकार, आभुषणे देत असतं. त्यावेळी हे सोने- चांदीचे दागिणी मिळवण्यासाठी अनेक सरदार आपल्या मालकाला खुश करण्यासाठी काम करत. आता ही असेच एक प्रकरण घडलंय. पण इथे मालक घोटाळे बाज आणि सरदार भ्रष्टाचारी आहेत. हाच काय तो फरक. नुकतेच कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. ईडीने जाहिर केलेल्या आरोपपत्रानुसार हा घोटाळा घडवून आणण्यासाठी बेकायदेशीर कॉन्ट्रक्टचा म

Read More

ईडीचा मोठा खुलासा! कोविड सेंटरमध्ये बीएमसी अधिकाऱ्यांना वाटलं ६० लाख रुपयांचं सोनं

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोेपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121