नवी दिल्ली : २०२० साली वर्षभर थैमान घालणाऱ्या कोविड व्हायरसने जगाला घाम फोडला होता. कोव्हिड काळात बसलेल्या आर्थीक तडाख्यातून बाहेर यायला खूप मोठा काळ जावा लागला. अशातच आता चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटान्यूमोनोव्हायरस) आढळला असून यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या अनेक रूगणालयांमध्ये रांगा लागल्या आहेत. अशातच आता भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मोठे वक्तव्यं केलं आहे.
ह्युमन मेटान्यूमोनोव्हायरस हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्यतः सौम्य ते मध्यम फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात हा फ्लू जास्त प्रचलित आहे. समाजमाध्यमांवर चीनच्या रूगणालयात रांगा लागल्याचे चित्र असले तरी सुद्धा अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आली नाही. सध्या सुरू असलेला निमोनियाचा उद्रेक विशेषतः लहान मुले आणि वृद्धं यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. लहानमुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसीत झालेली नसते, त्यामुळे अशा प्रकारच्या आजारात त्यांची काळजी घेणं अत्यंत महत्वाचे असते. दुसऱ्या बाजूला अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारख्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या वृद्ध प्रौढांना या रोगाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. या व्हायरस वर भाष्य करताना डॉ. अतुल गोयल बोलताना म्हणाले की हा व्हायरस सामान्य सर्दीला कारणीभूत ठरलेल्या व्हायरससारखा आहे, त्यामुळे चिंतेची आवश्यकता नाही. अद्याप तरी, भारतामध्ये या व्हायरसचा एकही रूग्ण आढळलेले नसून, चिंता करण्यासारखी परिस्थीती नसल्याचे गोयल म्हणाले आहेत.