मुंबई महापालिका कोविड घोटाळा! आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्यांची माहिती

    04-Jan-2024
Total Views | 103

Aditya Thackeray


मुंबई :
मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात उबाठा गटावर आरोप होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे अनेक पुराव्यांचे दाखले देत ठाकरे सरकारच्या काळात झालेले घोटाळे पुढे आणत आहेत. यातच आता आदित्य ठाकरेंच्या मित्रावरही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "आदित्य ठाकरेंचे मित्र आणि ओक्स कन्सलटन्सीचे राहूल गोम्स यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी ताडदेव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुलुंड आणि दहिसर येथील जंबो कोवीड सेंटर बांधण्याचा खर्च २८ कोटी रुपये एवढा आला होता. परंतू, मुंबई महापालिकेकडून १४० कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. मुलुंड आणि दहिसर येथील जंबो कोरोना केंद्रात बनावट कागदपत्र व खोट्या माहितीच्या आधारे ३७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओक्स मॅनेजमेंट कन्सलटन्सीचे संचालक राहुल गोम्स यांनी दहिसर व मुलुंड येथील जम्बो करोना केंद्राची उभारणी केली होती.
 
याप्रकरणी राहूल गोम्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते आदित्य ठाकरेंचे मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीसीच्या कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२० (ब) याअंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 'कोविड की लूट का हिसाब तो देना पड़ेगा,' असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121