विवेक अग्निहोत्रींच्या ‘त्या’ विधानाविरोधात शशी थरुर यांची कोर्टात धाव

    27-Sep-2023
Total Views |

vivek and shashi 
 
मुंबई : 'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी' या चित्रपटांच्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. करोना काळात जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कॉवॅक्सिन लसीबद्दलची सत्य कथा मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. त्यांनी त्यावरुन केलेलं एक धक्कादायक वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे.
 
 
 
काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी शशी थरुर यांच्याबद्दल एक विधान केले होते. यात त्यांनी थरूर यांनी एका परदेशी कंपनीच्या व्हॅक्सिनचे प्रमोशन करत त्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला होता. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशाप्रकारचे व्यवहार करत असतील तर काय बोलायचे, असा प्रश्नही अग्निहोत्री यांनी यावेळी उपस्थित केला होता. या विधानावरुन थरुर आणि अग्निहोत्री यांच्यात वाद पेटला असून अग्निहोत्री यांनी ज्याप्रकारे आरोप केले आहेत त्याची तीव्रता लक्षात घेऊन आपण त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा क़ॉग्रेसचे थिरुवअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांनी दिला आहे.