मुंबईतील लोकल सेवा आणि बेस्ट सेवेनंतर आता मुंबई मेट्रो सेवेलाही मुंबईकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचलित मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावरून एकाच दिवशी तब्बल ३ लाख १ हजार प्रवाशांनी प्रवास करत एक नवीन प्रवासी विक्रम केला आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या गाठत नवा मैलाचा दगड !, असे म्हणत एमएमएमओसीएलने आपला आनंद व्यक्त केला आहे.
Read More
विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प पूर्ण
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील भूमीपुत्रांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. ४० वर्षापासून १२.५% योजनेअंतर्गत देय भूखंड प्रलंबित असलेल्या ३१९ पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इरादापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रालयातील दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.
दक्षिण भारताचा सगळा भूभाग वेगवेगळी मंदिरे, मठ, वारसास्थळे यांनी नटलेला आहे. परकीय आक्रमणांतूनदेखील उत्तरेपेक्षा तुलनेने कमी विद्ध्वंस दक्षिणेत झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे बर्याच ठिकाणी जुनी - जशी होती तशी मंदिरे आपल्याला दिसतात. यातली अनेक आपल्याला परिचित आहेत, तर अनेक अपरिचित. कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात, बागलकोट तालुक्यामध्ये, रम्य तलावाच्या काठी, भोवतीने डोंगररांगा पांघरून, कदाचित बेळगावमधले सर्वांत जुने गाव वसलेले आहे. या गावाचे नाव आहे हूळी. येथील पंचलिंगेश्वर मंदिराविषयी जाणून घेऊया...
A historic resolution against Hinduphobia was recently passed in the Scottish Parliament मानवजातीच्या प्रगत वाटचालीत धार्मिक सहिष्णुता, बहुविधतेचा आदर आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष स्थान आहे. लोकशाही आणि मानवाधिकारांची प्रतिष्ठा ज्या जगात मानली जाते, त्यात काही विशिष्ट समुदायांविरुद्ध असहिष्णुतेचे प्रकार सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवरच स्कॉटलंडच्या संसदेमध्ये ‘हिंदूफोबिया’च्या विरोधातील एक ऐतिहासिक ठराव नुकताच संमत झाला.
( Sri Chakradhar Swami ) महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
( AMIT SHAH On Separatism in Jammu and Kashmir is a historical fact ) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने हुर्रियत कॉन्फरन्सशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून ही संघटना खोऱ्यात निष्क्रिय झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा विजय म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन, आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लाखोंच्या संख्येने झालेल्या मनुष्यहानीनंतरही, हा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, या आशेवर कोट्यवधी लोक जगत आहेत. युद्ध ही गोष्ट भीषण आहे, पण त्याहून भयावह म्हणजे या युद्धाचा परिणाम! दुसर्या विश्वयुद्धानंतर अनेक राष्ट्रांना स्थिरस्थावर होण्यासाठी, काही दशकांचा काळ जावा लागला. या दशकांमध्ये झालेली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांमुळे, जगभरातील समाजमन ढवळून निघाले. वर्तमा
२०२५ हे वर्ष ऐतिहासिक मराठी चित्रपटांसाठी विशेष ठरणार आहे. भक्ती आणि शौर्य यांचा संगम असलेले विविध चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'शिवराज अष्टक' नंतर नवे ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार आणि शिवरायांचा छावा या चित्रपटांद्वारे मराठा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडला. आता ते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि आनंदडोह हे दोन चित्रपट घेऊन येत आहेत.
भारतीय इतिहासाचे लेखन करताना साम्यवादी इतिहासकारांनी राष्ट्रीय भूमिकेला जाणीवपूर्वक दूर ठेवले. त्यामुळे समोर आणला गेलेला इतिहास हा कायमच एकांगी झाला. त्यातच आपल्या विचारांचे जाळे सर्वत्र पसरवून, इकोसिस्टमच्या निर्मितीचे कार्यही डाव्यांनी उत्तम केले. त्यामुळेच भारताच्या सत्य आणि तथ्य यावर आधारित इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज आहे.
बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा तसा मोठा आहे. पण, बरेचदा या चित्रपटांमध्ये इतिहासाचे एकांगी चित्रणदेखील पाहायला मिळाले. विशेषतः मुघल साम्राज्याचे उद्दातीकरण ते स्थानिक योद्ध्यांच्या पराक्रमाला तुलनेने कमी लेखण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नही झाले. पण, २०१४ नंतर हा प्रवाह बदललेला दिसतो. मराठा इतिहासावर आधारित ‘तान्हाजी’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. याच पार्श्वभूमीवर ‘छावा’ या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपटांचा नवा अध्याय सुर
‘छावा’ कादंबरीवर आधारित छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मांडणारा, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ’छावा’ चित्रपट दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. शिवाजी सावंत लिखित ‘छावा’ ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील गाजलेली कादंबरी. या कादंबरीमध्ये संभाजी महाराजांच्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि शौर्याची गाथा मांडणारा उत्कृष्ट आलेख लेखकाने सादर केला आहे. असे हे छत्रपती संभाजी महाराज केवळ शिवरायांचे सुपुत्र नव्हते, तर ते एक सक्षम योद्धा आणि कुशल प्रशासक होते. कादंबरीत त्यांच्या लहानपणापासून ते बलिदानापर्यंतचा प
प्रत्येक देशाचा इतिहास असतो आणि तो त्यांच्या नजरेतून लिहिला जातो. मात्र, भारतीय आधुनिक इतिहासाची मांडणी आजही भारतीयांच्या दृष्टिकोनातून झालेली नाही. त्यामुळेच या इतिहासातील काही निवडक घटनांचा आणि भारतीयांच्या अज्ञानाचा लाभ भारतद्वेष्टे घेत आहेत. त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी भारतीयांनी खर्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे.
भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day ) औचित्यावर विविध राज्यांतील सुमारे ५० हून अधिक लोकनृत्ये ५ हजार, १९९ लोककलावंतांनी नवी दिल्ली येथे ‘कर्तव्यपथा’वर सादर केली आणि या ऐतिहासिक क्षणाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. त्यानिमित्ताने लोककला, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे ‘ज्युरी’ म्हणून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले. त्यानिमित्ताने या अद्भुत, अविस्मरणीय लोकसोहळ्याचे त्यांनी रेखाटलेलेहे अनुभवचित्रण...
विवेक अग्निहोत्री, ज्यांनी 'द ताश्कंद फाइल्स' आणि 'द काश्मीर फाइल्स' सारखे चित्रपट दिले आहेत, ते सध्या त्यांच्या आगामी 'द दिल्ली फाइल्स' या चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट बंगालच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित असून, विशेषतः १९४६ मधील डायरेक्ट अॅक्शन डे आणि नोआखाली दंगलींवर प्रकाश टाकतो.
बालपण मराठवाड्यात घालविलेल्या एका तरुणाने जोपासलेल्या विविधांगी छंदांमुळे त्याचे ( Abhijit Bhujbal ) जीवन कसे बदलून गेले, त्याची ही यशोगाथा...
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. २०२५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून लक्ष्मण उत्तेकप यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले हे तर अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आता लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून नुकतीच दिग्दर्शक संदीप सिंग यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात मराठी किंवा हिंदी नव्हे तर
संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ चित्रपटातील 'राजं संभाजी' या गाण्याच्या नृत्याने झाला. मावळ्यांच्या या उत्स्फूर्त सादरीकरणाने एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्याविरोधात एकतर्फी प्रचार चालविणारे भारतीय माध्यमांतील काही पत्रकारही तोंडघशी पडले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केवळ ट्रम्प यांनीच केला होता, ही गोष्ट हॅरिसप्रेमी पत्रकार सोयीस्करपणे विसरतात. तसेच ट्रम्प आणि पुतीन यांचे मोदी यांच्याशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींचे प्रमुख हे भारताचे मित्र असल्याची दुर्मिळ घटना आता घडली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या भूमिकेला मोठा आधार आणि शक्ती प्राप्त झाली आ
बहुप्रतिक्षित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदीतील ऐतिहासिक चित्रपट छावा या वर्षाच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांच्या लूकचे फोटो देखील व्हायरल झाले होते. याशिवाय स्त्री २ च्या शो आधी देखील छावा या चित्रपटाची झलक व्हायरल झाली होती. पण आता अधिकृत टीझर भेटीला आला आहे.
‘मसान’ या चित्रपटापासून अभिनेता विकी कौशल याचा अभिनयातील प्रवास सुरु झाला. यानंतर एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्याने दिले. नुकताच त्याचा बॅड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बातचीत करताना तो बऱ्याच गोष्टींबाबत व्यक्त झाला. विकी कौशल याने दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात काम केले होते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ‘छावा’ या ऐतिहासिकपटात ही अभिनेता आणि दिग्दर्शकाची जोडी एकत्र दिसणार आहे.
यंदाचे वर्ष हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास असणार आहे. कारण, विविध विषय आणि आशयांवर आधारित कलाकृती मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागील काही काळात मराठी चित्रपटांतून छत्रपती शिवरायांचा इतिहास हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. आता शिवरायांच्या सोबतीने त्यांच्या धाडसी मावळ्यांचे, सेनानींचे असेच आणखीन काही ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याविषयी...
मथुरेतील श्री कृष्णजन्मभूमीच्या जागी असलेले मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर मुघल शासक औरंगजेबाने तेथे शाही ईदगाहची इमारत बांधली होती. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे दिली आहे. माहिती अधिकारांतर्गंत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एएसआयने ही माहिती दिली.
राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा
प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होत आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव आज तब्बल 50 हजार दिव्यांनी उजळून निघाल्याचे दिसून आले. कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो रामभक्त सहभागी झाले होते.
लंडनच्या ’रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी’चा एक विद्वान रॉबर्ट पेकहॅम माने ‘फिअर ः अॅन आल्टर्नेटिव्ह हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड’ या 450 पानी ग्रंथाद्वारे, विविध प्रकारच्या भयांमुळे इतिहास कसा घडत गेला, याचं विवेचन केलं आहे.
दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
इतिकासकालीन विविध दस्तावेजांचा, नाण्यांचा ऐतिहासिक ठेवा बंदिस्त न राहता, लोकाभिमुख व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करणार्या संतोष चंदने यांच्याविषयी...
५ ऑक्टोबर २०२२ या विजयादशमीच्या मुहूर्तावर 'शिवप्रताप - गरुडझेप' रसिकांच्या भेटीला येणार आहे.
वर्षा सहल म्हणजे पर्यटकांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. त्यातच यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवाच्या औचित्यावर भारतीय पुरातत्त्व विभागाने ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांवर विनामूल्य प्रवेश जाहीर केला आहे. नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंद घेता यावा याकरिता ऐतिहासिक स्थळे आणि स्मारकांमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आला आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे महानगर यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चापेकर बंधूच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता स. प. महाविद्यालय मैदान येथे हे महानाट्य होईल, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती, पुणे महानगराचे अध्यक्ष रविंद्र वंजारवाडकर आणि इत
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ जून रोजी देहू दौर्यावर येत आहे. देहूतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्याहस्ते पार पडणार आहे.
"आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वारस्य दाखवणे आणिही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी, कॉर्पोरेट्स आणि नागरी संस्था संस्था आपल्या वारशाचे रक्षण, जतन आणि प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात जेणेकरून भावी पिढ्यांना या खजिन्यांचा लाभ घेता येईल." असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केले.
कल्याण तालुक्याला उल्हास, वालधुनी आणि काळू नदीच्या रूपाने नैसर्गिक जलसंपदा लाभली आहे. मात्र, याच जलसंपदेला आता प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत नेहमीच नाल्याने रंग बदलल्याच्या घटना समोर येत असतात. त्यावरून येथील प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय येतो. कल्याण परिसरातील नद्यांची ‘मॅगसेसे पुरस्कार’ विजेते तथा ‘वॉटरमॅन’ राजेंद्र सिंह यांनीही नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या परिसरातील नद्यांची दुरवस्था झाली असून त्या सध्या ‘आयसीयु’मध्ये आहेत.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी संशोधन करण्यासाठी तैवान सरकारने भारतीय संशोधक आणि इतिहासकारांना तैवानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. खास यासाठी तैवान सरकारने आपले राष्ट्रीय अभिलेखागार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या तैवान दूतावासाचे उपप्रतिनिधी मुमिन चेन हे शनिवारी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एफआयसीसीआयद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते.
ब्रिटिशकाळात देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल, १८५३ साली ‘बोरीबंदर ते ठाणे’ अशी धावली. त्यावेळी धावलेले वाफेवरील रेल्वे इंजीन ठाणे रेल्वे स्थानकात जतन करण्यात येत आहे. ठाणे स्थानकात रेल्वे इंजीन बसवण्यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा करणार्या आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
खिलाफत चळवळीने भारतातील मुस्लिमांचे मन किमान पाच वर्षे व्यापून टाकले होते. सैद्धांतिक आधाराशिवाय हे शक्यच नव्हते. सैद्धांतिक आधाराला कोणतीही ’एक्स्पायरी डेट’ नसल्यामुळे खिलाफत चळवळीला ऐतिहासिक पूर्वाधार असणार आणि भविष्यात तिची पुनरावृत्ती होणार, हे ओघाने आले.
युएईने इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे धाडसी पण प्रासंगिक पाऊल टाकल्याने भारताचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. इस्रायलचे तंत्रज्ञान, युएईचे भांडवल आणि भारतीय मनुष्यबळ यांच्या संयोगाने भारत, तसेच अन्य विकसनशील देशांच्या प्रगतीसाठी मोठे योगदान प्राप्त होऊ शकते.
तान्हाजी मालुसरेंच्या घराण्याबद्दल आणि वंशाबद्दल दाखविलेली माहिती खरी नसल्याचा आरोप
ऐतिहासिक लंडन ब्रिजवर पादचाऱ्यांवर झालेला चाकूहल्ला व गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फी महोत्सव-२०१९ चे उद्घाटन गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर आजपासून रंगणार असून, या महोत्सवाचे हे ५० वे ऐतिहासिक वर्ष आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र एका विशेष गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे राज्यसभेतील मार्शल यांचा बदलेला पोशाख.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठमोळ्या इतिहासाचे दर्शन प्रेक्षकांना ज्या चित्रपटातून घडणार आहे अशा 'तान्हाजी- द अनसंग वोरीअर' या चित्रपटातील आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आज आले आहे.
१७६१ साली पानिपत अस्तित्वात आले. याच पानिपतमध्ये झालेल्या मराठा आणि अहमद शहा अब्दाली झालेल्या लढाईवर आधारित 'पानिपत' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी आज त्याचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे.
मधु मंटेना दिग्दर्शित ‘महाभारत’ या चित्रपटांच्या मालिकेमध्ये दीपिका महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. दीपिकाने आत्तापर्यंत घरंदाज स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण त्यापेक्षा आणखी एक वेगळी कलाकृती आगामी चित्रपटातील ‘द्रौपदी’ च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
तिच्या डोळ्यातला चंद्र मावळात नाही...खरेच हिरकणीचे वर्णन करणारे अतिशय समर्पक शब्द आणि भावना असलेल्या 'हिरकणी' या चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे आज प्रदर्शित झाले. 'आईची आरती' हे चित्रपटातील नवीन गाणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी गायले आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी- द अनसंग वाॅरिअर या आगामी चित्रपटाची २ पोस्टर आज प्रदर्शित झाली. अजय देवगण आणि सैफ अली खान हे दोघेही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार या पोस्टरमध्ये दिसत आहेत.
हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओकचा देवाचा अवतार साकारणाऱ्या, चेहऱ्याला रंग फासलेल्या दशावतारी वेशातील पोस्टर सध्या खूप व्हायरल होत आहे. 'प्लॅटून वन फिल्म्स' या संस्थेची निर्मिती असलेल्या 'पिकासो' या मराठी चित्रपटाचा हा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
९ कलाकार, ६ लोककलांमधून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देणार आहेत शिवराज्याभिषेक गीतांमधून. हे गाणे आज प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी या गाण्यांची छोटीशी झलक सोशल मीडियावरून शेअर केली आहे.
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जाहीर केला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत केले जात आहे.