ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2022   
Total Views |
Kanheri
 
मुंबई ( विशेष प्रतिनिधी): "आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वारस्य दाखवणे आणिही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी, कॉर्पोरेट्स आणि नागरी संस्था संस्था आपल्या वारशाचे रक्षण, जतन आणि प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात जेणेकरून भावी पिढ्यांना या खजिन्यांचा लाभ घेता येईल." असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केले. ते बुद्धपौर्णिमेनिमित्त कान्हेरी लेणी येथे आयोजित विविध सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कान्हेरी लेणी येथेे या सुधारित पायाभूत पर्यटन सुविधांचे रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इंडियन ऑइल फाउंडेशन आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी देखील उपस्थित होते. 
 
 
अभ्यागत मंडप, संरक्षांकांसाठी राहण्याची सोय, बुकिंग ऑफिस यांसारख्या जुन्या इमारतींमध्ये दुरुस्ती करुन त्यांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. बुकिंग काउंटर ते संरक्षक क्वार्टरपर्यंतचा परिसर 'लँडस्केपिंग'द्वारे सुशोभित करण्यात आला आहे. अभ्यागतांच्या व्यवस्थेसाठी ११ चित्रात्मक पॅनेल्सही लावण्यात आले आहेत. या पॅनल्सच्या मदतीने प्रमुख लेण्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे 'इंटरप्रिटेशन सेंटर' उभारण्यात आले आहे. कान्हेरी लेण्यांमधील भटकंती अधिक सुकर करण्यासाठी परिसराच्या नकाशाचीही सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
 
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या संपूर्ण परिसराच्या 'थ्री डी' 'व्हर्च्युअल टूर'वर काम करीत आहे. कान्हेरी लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा (कोअर) क्षेत्रात येतात. त्यामुळे या भागात वीज व पाणीपुरवठ्याची व्यवस्थित सोय नाही. मात्र, या प्रकल्पांतर्गत सौरऊर्जेच्या माध्यमातून या भागात विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
इसवी सनाच्या पहिल्या ते दहाव्या शतकातील येथील बौद्ध शिल्पे, कोरीवकाम, चित्रे आणि शिलालेख सुप्रसिद्ध आहेत. सातवाहन, त्रिकुटक, वाकाटक आणि शिलाहार राजवटींच्या काळात या लेण्यांचे महत्त्व अधिक वाढले. तसेच तत्कालीन श्रीमंत व्यापाऱ्यांनी दिलेल्या देणग्यांमुळे कान्हेरीची भरभराट झाल्याचे सांगितले जाते.
@@AUTHORINFO_V1@@