ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी- द अनसंग वाॅरिअर या आगामी चित्रपटाची २ पोस्टर आज प्रदर्शित झाली. अजय देवगण आणि सैफ अली खान हे दोघेही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार या पोस्टरमध्ये दिसत आहेत. अजय देवगण या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तर या ऐतिहासिक पटात सैफ अली खान उदय भानाची भूमिका साकारणार आहे.
याव्यतिरिक्त काजोल देखील या चित्रपटातील एका गण्यामध्ये झळकणार असल्याची चर्चा असून हे गाणे फिल्म सिटीमधील एका भव्य सेटवर चित्रित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे हे नवीन पोस्टर अजय देवगणने तसेच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले.
'तानाजी' या चित्रपटात सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे आणि उदय भान यांच्यातील चुरशीची लढाई रेखाटण्याचा प्रयत्न ओम राऊत यांनी केला आहे. ओम राऊत या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा चित्रपट विशेष असेलच पण प्रेक्षकांना देखील तो काळ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवता येईल ही देखील एक जमेची बाजू आहे. हा चित्रपट येत्या १०
जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
In 3D... Ajay Devgn and Saif Ali Khan in #Tanhaji: The Unsung Warrior... Directed by Om Raut... Produced by Ajay Devgn, Bhushan Kumar and Krishan Kumar... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior pic.twitter.com/VVq8XxRbQA
— taran adarsh (@taran_adarsh) October 21, 2019