ऐतिहासिक लंडनब्रिजवर दहशतवादी हल्ला

    30-Nov-2019
Total Views |



लंडन : ऐतिहासिक लंडन ब्रिजवर पादचाऱ्यांवर झालेला चाकूहल्ला व गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला असून, या दहशतवादी हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसर रिकामा केला. चाकूहल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल असल तरी पाठोपाठ गोळीबाराचे वृत्त आल्याने भीतीचे वातावरण पसरले.

लंडन शहरात झालेल्या या घटनेमुळे खळबळ माजली असून पोलिसांनी या परिसराला वेढा घातला आहे. या ब्रिजवरील वाहतूक थांबविण्यात आली असून या परिसरातील कार्यालये आणि इमारतींना टाळे ठोकण्यात आले आहे. या घटनेनंतर तेथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली आहे.

या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा प्रकार नक्की कोणत्या कारणास्तव घडला हे सुस्पष्ट झाले नसले तरी आम्ही याकडे दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून पाहात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने सक्रिय झाल्याबद्दलही त्यांनी कौतुक केलं आहे. याबाबत ट्विटरच्या माध्यमातून जॉन्सन यांनी माहिती दिली.

याआधी लंडन ब्रिजवर जून २०१७ मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला होता.

अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि ..

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121