हातात कोरी पानं घेत 'शो'बाजी करणारे 'मीडिया का गुब्बारा' कोण हे...; रवींद्र चव्हाण यांचा राहुल गांधींवर घणाघात

    26-Jul-2025
Total Views |


मुंबई : हातात कोरी पानं घेत 'संविधान बचाव' ही 'शो'बाजी करणारे 'मीडिया का गुब्बारा' कोण? हे सुज्ञ जनतेने केव्हाच ओळखलंय, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राहुल गांधींवर केला आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रॉब्लेम नाहीतच. १९७१ पासून काँग्रेस 'रोटी, कपडा, मकान' भूलथापा मारत होती, पण मोदीजींच्या नेतृत्त्वात केवळ ११ वर्षांत देशात आणि पर्यायाने स्वतःच्या आयुष्यात घडणारा कायापालट देशवासियांनी फार जवळून बघितला. तब्बल २५ कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी दारिद्र्यरेषा ओलांडली."


सुंभ जळाला तरी पीळ जात नाही!
"म्हणूनच कायम सत्ताधीशाच्या मग्रुरीत राहिलेल्या काँग्रेसचा अहंकाराचा 'गुब्बारा' जनतेने वारंवार फोडला. मात्र, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. राष्ट्रसेवक मोदीजींना काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांनी 'गुब्बारा' म्हणणे हे याच अहंकारातून येते. हातात कोरी पानं घेत 'संविधान बचाव' ही 'शो'बाजी करणारे 'मीडिया का गुब्बारा' कोण? हे सुज्ञ जनतेने केव्हाच ओळखलंय, एवढंच राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावं," असा टोला त्यांनी लगावला.