सामनाचा खप कमी होत चाललाय! टोमणे मारल्याशिवाय...; कुणी केली टीका?

    26-Jul-2025
Total Views |


नागपूर : सामनाचा खप कमी होत चालला आहे म्हणून टोमणे मारल्याशिवाय झोप लागत नाही, असा घणाघात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. शनिवार, २६ जुलै रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सामना या उबाठा गटाच्या मुखपत्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सामनाला टोमणे मारल्याशिवाय झोप लागत नाही. सामनामध्ये काहीतरी खरमरीत आणि खोटे लिहून येत असल्यामुळे लोक वाचतात. सामनाचा खप कमी होत चालला आहे. स्फोटक बातम्या छापल्या की, लोक पेपर वाचायला घेतात. त्यामुळे सामना पेपरचा खप वाढवण्यासाठी तसेच संपादकांच्या आणि मालकाच्या प्रसिद्धीसाठी ते रोज काही तरी लिहीत असतात," अशी टीका त्यांनी केली.

रोहित पवारांचा फुसकी बार!

रोहित पवारांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, "रोहित पवारांना दिवसभर माध्यमांमध्ये राहायचे असल्याने त्यांनी फुसकी मारण्याचा प्रयत्न केला असावा. मंत्र्यांचे फोन टेप करण्यासाठी भरपूर फॉरमॅलिटी आहे. कुणाचेही फोन कुणालाही टेप करता येत नाहीत. त्यामुळे हा फुसकी बार आहे," असेही ते म्हणाले.