मुंबईत मनसेत मोठे फेरबदल! नवीन विभाग अध्यक्षांच्या नियूक्त्या
26-Jul-2025
Total Views |
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शनिवार, २६ जुलै रोजी मनसेत ९ नव्या विभाग अध्यक्षांच्या नियूक्त्या करण्यात आल्या असून अनेक जागांवर फेरबदलही करण्यात आले आहेत.
सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईत खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! pic.twitter.com/f7era3UOif
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 26, 2025
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. मनसे आणि उबाठा गट महापालिका निवडणूका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरु असल्या तरी मनसेने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत अनेक नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियूक्त्या केल्या असून लवकरच त्यांच्या बैठका होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियूक्त्या पुढीलप्रमाणे :
१) महेश फरकासे - कांदिवली पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष २) पांडुरंग राणे - दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष ३) विजय पवार - दहिसर विधानसभा विभाग सचिव ४) विश्वास मोरे - बोरीवली विधानसभा विभाग अध्यक्ष ५) भरत आर्य - जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष ६) प्रदिप वाघमारे - कुर्ला विधानसभा विभाग अध्यक्ष ७) दिनेश पुंडे - मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्ष ८) रविंद्र शेलार - अणुशक्ती नगर विधानसभा विभाग अध्यक्ष ९) अनिल राजभोज - भांडुप पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष