पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूमध्ये

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे करणार लोकार्पण

    22-May-2022
Total Views |
 

pm modi
 
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ जून रोजी देहू दौर्‍यावर येत आहे. देहूतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्याहस्ते पार पडणार आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते.
 
 
 सदर आमंत्रण पंतप्रधान मोदींनी स्विकारले असून १४ जूनला ते देहूत येणार आहेत विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान देहूला भेट देणार असून महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.