'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम...'; विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर प्रदर्शित

    19-Aug-2024
Total Views | 79
 
chhaava
 
 
मुंबई : बहुप्रतिक्षित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदीतील ऐतिहासिक चित्रपट छावा या वर्षाच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांच्या लूकचे फोटो देखील व्हायरल झाले होते. याशिवाय स्त्री २ च्या शो आधी देखील छावा या चित्रपटाची झलक व्हायरल झाली होती. पण आता अधिकृत टीझर भेटीला आला आहे.
 
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाच्या टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्रमक अवतारात अभिनेता विकी कौशल पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की गनिमांनी किल्ल्याला वेढा घातला आहे. पुढे चिलखत परिधान करुन घोड्यावर स्वार होत छत्रपती संभाजी महाराज शत्रूंचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. 'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम छावा', असा संवाद कानावर ऐकू येतो. संभाजी महाराज आक्रमकपणे गनिमांशी लढताना दिसतात. आणि शेवटी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत सिंहासनावर विराजमान असलेले शंभूराजे पाहायला मिळतात.
 
 
chhaava
 
'छावा'च्या टीझरमध्ये प्रत्येक क्षणी विकीचा ताकदीशीर अभिनय बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहणं ही खरंच एक पर्वणी असणार यात शंका नाही. या चित्रपटातअभिनेत्री रश्मिका मंदाना येसूबाईंची भूमिका साकारत असून ६ डिसेंबर २०२४ रोजी 'छावा' चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121