कलम ३७० रद्द केल्याने भारतवासीयांसाठी सोनियाचा दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |


 


भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जाहीर केला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत केले जात आहे. आजपर्यंत अशांतता आणि हिंसेने घेरलेल्या या प्रदेशासाठी एक चांगला निर्णय मोदी सरकारने घेतला, याबद्दल त्यांचे अभिनंदनदेखील केले जात आहे. या निर्णयासह आता देशभर अनेक मिम्सदेखील केले जात असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर सध्या 'काश्मीर हमारा है', 'काश्मीर पर फायनल फाईट', 'भारत एक है' असे हॅशटॅगदेखील ट्रेंडिंग आहेत. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाचे प्रतीक असेल. पण त्याचबरोबर संपूर्ण भारतवासीयांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांनी सरकारचे या ऐतिहासिक आणि साहसी निर्णयाचे अभिनंदन केले. या निर्णयानुसार राज्यसभेत जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनेचा प्रस्ताव, लडाख आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधीमंडळ कायम राहणार तर लडाखमध्ये स्वतंत्र विधीमंडळ नसेल.

 

@@AUTHORINFO_V1@@