मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
Read More
(Ulhasnagar) उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावरुन आपल्या एक महिन्याच्या बाळाला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय केवळ १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बालिकेला दत्तक दिले असल्याची माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. यावेळी तिने संपूर्ण प्रकार सांगत बालिकेला पुन्हा देण्याची मागणी केली आहे.
ठाणे : ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास’ (एमआयडीसी) महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, या काळात ‘ठाणे महापालिका’ क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा ( Water Supply ) पूर्ववत
( Kalwa Mumbra Assembly Constituency ) कळवा - मुंब्रा विधानसभेमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच शनिवारी दि. २६ ऑक्टोबर कळवा येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला बाहेरगावी असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. या निवडणुकीमध्ये नजीब मुल्लाच विजयी होतील आणि निवडणुकीत कळवा मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू असा इशारावजा दावा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्याच्या पठ्ठयाला जोर का धक्का दिला आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक असलेल्या तब्बल ८ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजितदादा गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना मध्यंतरी ठाण्यात आलेल्याअजितदादानी आमदार जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख ठाण्याचा पठ्ठया
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीला ३० वर्षे झाली असुन इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जीवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, २०२३ मध्येच महापालिका प्रशासनाने कोट्यवधी खर्चुन रुग्णालयाचे नुतनीकरण केले होते.
निधी मिळाला नाही असे धादांत खोटे बोलणारे आ. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त झाले आहेत. महायुती सरकारकडून मुंब्रा-कळव्यासाठी १०५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले. अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी रिंगणात असलेले महायुतीचे ९ उमेदवार विजयी होतील.
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी एकाच दिवशी 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जून महिन्यामध्ये 21 नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, सिव्हील रुग्णालय स्थलांतरित झाल्याने तसेच भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण भागांत ‘एनआयसीयू’ची सुविधा नसल्याने कळवा रुग्णालयावर ताण येत असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयासमोर कळवा खाडी पात्रातील अतिक्रमण ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी निष्कासित केले होते. या मोकळ्या झालेल्या जागेवर निसर्ग उद्यान वॉकिंग पथ आणि दशक्रिया विधी घाट उभारावे. अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालानंतर सहायक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) आणि व्याख्यात्यावर (लेक्चरर) कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. २० डिसेंबर रोजी दिली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्युतांडव प्रकरणाचे पडसाद बुधवारी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. भाजपचे आ.निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी, नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार सहायक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) व व्याख्यात्यावर (लेक्चरर) आज कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट केले.
ठाणे ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल डब्यामध्ये एका तरूणावर धारदार ब्लेडने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जखमी तरुणाच्या तक्रारीवरून सोमवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
कळवा पूर्व येथील लोकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधीचे १६ गुंड दर महिन्याला ३० ते ४० लाखाची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनीच दिल्याचा भंडाफोड राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच येत्या शुक्रवारी कळवा पूर्वेकडील लोकांसाठी आव्हाडांनी हंडा मोर्चाचा फार्स ठेवला आहे. त्याची चिरफाडच एकप्रकारे मुल्ला यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे, प्रकाश बर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे आदी उपस्थित होते.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडव प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीकडुन शासनाला सादर केलेल्या अहवालात कुणावरही ठपका न ठेवल्याने आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, रुग्णसेवेत होत असलेल्या हेळसांड प्रकरणी आ. केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारला. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी याप्रकरणी निश्चितच कारवाई होणार असल्याचा निर्वाळा दिल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे जिल्हा समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे गणेश दर्शनासाठी गेले असता कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्ट रोजी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल गेल्या आठवड्यात शुक्रवारी शासनाला सादर केला आहे. या अहवालात कोणावरही ठपका ठेवला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे चौकशी समितीच्या चौकशीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
कळवा पूर्वेतील रिक्षा थांब्यांवर नशेच्या पदार्थांचे सेवन करणाऱ्या रिक्षा चालकांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याबाबतचे वृत्त 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर कळवा पोलिसांनी तातडीने छापेमारी करून गर्दुल्या रिक्षाचालकांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
ठाण्यातील कळवा रुग्णालयातील मृत्यु रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर सरसावले असुन त्यांनी संपुर्ण रुग्णालय प्रशासनालाच 'डोस' पाजला आहे.रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करुन सर्वोच्च रुग्ण्सेवा देण्यास प्राधान्य देण्याचे बजावुन हलगर्जी झाल्यास संबधित विभागाच्या प्रमुखालाच जबाबदार ठरवण्यात येणार असल्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.त्याचप्रमाणे कळवा रुग्णालयात प्रशासकिय बदल केले असुन अधिष्ठाता व डॉक्टरांवर प्रशासकिय कामकाजाचा कोणताही बोजा नसणार आहे.ही जबाबदारी कार्यालयीन अधिक्षक व लिपिकावर सोप
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेली मृत्युंची घटना ही अत्यंत दुर्दैवी व क्लेशकारक आहे.तेव्हा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग प्लाझा रुग्णालय पुन्हा सुरु करण्यासोबतच कळवा रुग्णालयासाठी अॅक्शन प्लॅन बनवावा. अशा सुचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना सोमवारी निवेदन देऊन केल्या. याप्रसंगी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला येत्या २५ ऑगस्ट पर्यत अहवाल सादर करण्याबाबत सूचना सरकारने केल्या आहेत. राज्याचे सहसचिव अशोक अत्राम यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या अद्यादेशात वरील सूचना नमूद करण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही दिवसांत झालेले रुग्णांचे मृत्यू धक्कादायक व चिंताजनक आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना आ. निरंजन डावखरे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस करून सर्वांना धीर दिला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती.
ठाणे : पावसाने दडी मारलेली असतानाही ठाण्यात पडझडीची सुरुवात झाली. कळव्यातील खारेगाव परिसरातील हिरादेवी मंदिरा जवळील तळ अधिक दोन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब व टेरेसची भिंत कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने जिवितहानी टळली असुन एका दुचाकीचे नुकसान झाले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आरती सूर्यवंशी यांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयात पीएचडी केली, पुस्तके लिहिली आणि जनजागृतीसाठी ‘टॉक शो’ सुरू केले. समाजप्रबोधनातून आत्मिक समाधान मिळवणार्या डॉ. आरती यांच्याविषयी...
शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान, अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी लाँ
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे.ठाणे महापालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या साथीने हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे.
पावसाळ्यापूर्वीच ठाण्यात पडझड सुरु झाली आहे. कळवा येथील सूर्यनगर भागात शनिवारी दुपारी श्री साईनिवास या चार मजली अनधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळुन दोन चिमुकले जखमी झाले. त्यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी, कॉलमला तडे गेल्याने ठाणे महापालिकेने तुर्तास या सदनिकेला सील ठोकले आहे.
दररोजच्या वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी, यासाठी कळवा खाडीपुलावर नवीन तिसरा पूल उभारण्यात येत आहे. ठाणे-कळवा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या या तिसर्या पुलाच्या पोलीस आयुक्तालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट उलटून सप्टेंबर सरत आला तरी अद्याप नवीन कळवा पुलाच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळालेला नाही.
मविआ सरकार कोसळल्याने मंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागलेल्या जितेंद्र आव्हाडाना आता कळवा खाडी पुल खुला करण्यासाठी जाग आली आहे.
टोरेंट पॉवरद्वारे संशयास्पद विद्युत मीटरची विशेष तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिळ - मुंब्रा - कळवा परिसरातील ३० हजारहुन अधिक वीज मीटर सतत अनपेक्षितपणे कमी वापरासाठी टोरेंट पॉवर लिमिटेडच्या तपास यादीत आलेले आहेत.
ठाणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत चार सदस्यीय ३३ प्रभागातील १३१ जागांपैकी ६६ जागा महिलांसाठी आरक्षित असतानाही तब्बल ७२ जणी निवडुन आल्या होत्या.२०२२ मध्ये त्रिसदस्यीय ४७ प्रभागातुन १४२ जागांपैकी ७१ जागा महिलासाठी आरक्षित आहेत.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटना दरम्यान पाण्याची नौटंकी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच, शिवसेनेचे नाव न घेता, त्यांनी पाण्याचे वॉल बंद करून महिलांना त्रास देणाऱ्यांची हाडे मोडेन अशी धमकी दिली आहे. कळवा येथे वनविभागाच्या जागेत २० लाख लीटर पाण्याच्या टाकीचे लोकार्पण रविवारी आव्हाड यांच्याहस्ते पार पडले; त्यावेळी ते बोलत होते. मंत्री आव्हाडांच्या या वक्तव्याला शिवसेनेकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मध्य रेल्वेवरील कळवा हे अत्यंत गर्दीच्या स्थानकांमधील एक आहे. तरीही इथल्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे रेल्वे प्रशासन लक्षच देत नसल्याने पारसिक प्रवासी संघ आणि मुंबई रेल प्रवासी संघ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत
"कळवा, मुंब्र्यात अनधिकृत बांधकामे आपण येण्यापूर्वीच झालीत.", अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून केली. कळवा येथील दलदलीच्या मोकळ्या भुखंडावर उभारण्यात आलेल्या स्व. मुकूंद केणी क्रीडा संकुलाचे लोकार्पण रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
कळवा येथील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान श्रेयवादाचे राजकारण करणार्या मंत्र्यांना कळवावासीयांकडून विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत. खारेगाव उड्डाणपुलासाठी १४ वर्षांच्या प्रतीक्षेचा वनवास संपला असला तरी येथील समस्यांचा वनवास कधी संपुष्टात येणार, असा सवाल कळव्यातील नागरिक सत्ताधार्यांना विचारत आहेत.
कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचे काम दि. २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची हमी ठाणे महापालिकेने रेल्वेला दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कोविड नियमांना अक्षरश: तिलांजली दिल्याचे यावेळी दिसून आले.
कळवावासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि ठाण्यापुढील रेल्वे सेवेच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेले खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम ’तारीख पे तारीख’ देऊनही रखडलेलेच आहे. यापूर्वी, मध्य रेल्वेकडून विचारणा होताच, उड्डाणपुलाचे काम दि. २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची हमी ठाणे महापालिकेने रेल्वेला दिली होती.
फेरीवाल्याच्या हल्यात बोटे गमावलेल्या ठाणे महापालिकेच्या माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे त्यांच्या सुरक्षारक्षक सोमनाथ पालवेसह पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आल्या
कळवा दुर्घटना प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
या अपघातामधून चारजणांना वाचवण्यात बचावपथकाला यश
अतिक्रमण करणाऱ्यांनी केला हल्ला
अगदी चार दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला घरातच बाळत व्हावे लागल्याची घटना ताजी असताना दुस-या एका महिलेवर रुग्णवाहीकेमध्ये बाळाला जन्म देण्याची वेळ आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगरत शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा गर्भवती महिलांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबणार की नाही, असा गंभिर सवाल रुग्णालय प्रशासनाला विचारला जात आहे.
र्षांनुवर्षे शिवसेनेचाच आमदार अशी मक्तेदारी असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात जवळपास गेल्या १० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या खुबीने प्रवेश मिळवला.
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले.
महापारेषणच्या कळवा येथील ४००/२०० र्ज्ञीं एकत सब स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री बिघाड झाल्यामुळे महावितरणला भारनियमन करावे लागले आहे.