बोटे गमावलेल्या 'त्या' सहाय्यक आयुक्तांचा पुन्हा हातोडा

१०९ दिवसानंतर कल्पिता पिंपळे अॅक्शन मोडमध्ये !

    18-Dec-2021
Total Views | 99

thane_1  H x W:
ठाणे : फेरीवाल्याच्या हल्यात बोटे गमावलेल्या ठाणे महापालिकेच्या माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे त्यांच्या सुरक्षारक्षक सोमनाथ पालवेसह पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आल्या आहेत. १०९ दिवसानंतर शुक्रवारी पिंपळे यांनी घोडबंदर रोडवरील कोलशेत परिसरात भूमाफियांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
 
३० ऑगस्ट रोजी कासारवडवली येथील अतिक्रमणे आणि फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या सहा.आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केला होता. या हल्यात पिंपळे आणि त्यांचा सुरक्षारक्षक सोमनाथ पालवे यांच्या हाताची दोन बोटे छाटली गेली होती. तब्बल ३ महिने त्याचावर उपचार सुरू होते.उपचारानंतर डिसेंबर महिन्यात दोघांनीही पुन्हा आपल्या सेवेला सुरुवात केली.
 
 
पिंपळे या पुन्हा माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीमध्ये रुजू होताच कोलशेत येथील मीरा आई परिसरात भूमाफियांनी कांदळवन तोडून खाडी बुजवून उभारलेल्पा अनधिकृत चाळीवर हातोडा मारला.भविष्यात तीव्र कारवाई पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121