ठाणे : मराठीत बोलता आले नाही म्हणून व्यापाऱ्याला मारहाण करण्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. ठाण्याचे उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारेसंह त्यांच्या सर्मथकांनी व्यापाऱ्याला मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडियोत विचारे खुर्चीवर बसले आहेत, तर उबाठा गटाचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांला मारहाण करत आहेत, यावेळी विचारेंच्या एका कार्यकत्याने व्यापाऱ्याच्या कानशीलात लगावत "मराठीत बोल मराठीत" असे धमकावून माफी मागण्यास भाग पाडत असल्याचे दिसून येत आहे.
याबद्दल, उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले कि, "मी या घटनेबद्दल राजन विचारे सोबत बोलणे झाले. हा वाद कोणत्याही मराठी-अमराठी भाषेतून झालेला नसून, तो आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला त्याचा फोन चार्ज करू न दिल्याने सुरू झाला आणि तो वाढला." असे ते म्हणाले.
व्यापाऱ्यांना सुरक्षिततेबद्दल चिंता
सततच्या होणाऱ्या मारहाणीच्या घटनांनी विशेषत अमराठी भाषिक व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या मारहाणीने अनेक व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील आपल्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.