ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागातील एका शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मासिक पाळी तपासणीसाठी जबरदस्ती कपडे उतरवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीसांकडून तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
एका विद्यार्थिनीच्या पालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना शाळेच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये बोलावण्यात आले आणि प्रोजेक्टरद्वारे त्यांची तपासणी करून शौचालय आणि जमिनीवर रक्ताच्या डागांचे फोटो दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की त्यापैकी कोणी मासिक पाळीतून जात आहे का?
त्यानंतर मुलींना दोन गटात विभागून मासिक पाळी येत असणाऱ्या मुलींना शिक्षकांच्या अंगठ्याचा ठसा घ्या असे, सांगण्यात आले. आणि ज्या मुलींनी आपल्याला मासिक पाळी येत नाही असे सांगितले होते त्या सर्वांना एकामागून एक शाळेच्या शौचालयात नेत जबरदस्तीने कपडे उतरवण्यास पाडून एका महिला कर्मचारीने त्यांचे गुप्तांग तपासले असे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेबाबत शहापूर पोलिसांलनी सांगितले की, "मंगळवार दि. ८ जुलै रोजी हा प्रकार घडला असून, बुधवारी रात्री या शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका महिला कर्मचारीला विद्यार्थिनींना नग्न करून मासिक पाळीसाठी त्यांचे गुप्तांग तपासल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे." असे पोलीसांनी सांगितले.
"मुलींची अशा प्रकारे जबरदस्ती तपासणी होणे ही बाब संतापजनक असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल."
"भारतीय न्याय संहिता कलम ७४ (महिलेची विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि ७६ (वस्त्रहरण करण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे) या कलमाअंतर्गत
मुख्यधापकांसह आठ जणांविरुद्ध POCSO गुन्हा दाखल करण्यात आला आहे." असे ठाणे ग्रामीण अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल झाल्टे यांनी सांगितले.
घडलेल्या प्रकाराने, मुलींच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळून त्यांनी बुधवारी शाळेच्या आवारात निदर्शने केली आणि या घटनेत सहभागी असलेल्या व्यवस्थापन आणि शिक्षकांवर कारवाईची मागणी केली होती.