गर्भवतीची फरफट; रुग्णवाहिकेतच बेशुद्ध अवस्थेत दिला बाळाला जन्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020
Total Views |
Ulhasnagar hospital and n
 
 
 
 
उल्हासनगर : अगदी चार दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला घरातच बाळत व्हावे लागल्याची घटना ताजी असताना दुस-या एका महिलेवर रुग्णवाहीकेमध्ये बाळाला जन्म देण्याची वेळ आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगरत शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा गर्भवती महिलांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबणार की नाही, असा गंभिर सवाल रुग्णालय प्रशासनाला विचारला जात आहे.
 
 
 
काही दिवसांपासून उल्हासनगरातील शासकीय रुग्णालय डॉक्टरांच्या असंवेदनशील वागण्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. उल्हासनगर सी. ब्लॉक परीसररात राहाणारी राधिका संदिप राक्षे ही २० वर्षीय महिलेने मध्यवर्ती रुग्णालयात प्रसूतीसाठी नाव नोंदवले होते. त्यानुसार तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. २४ तारखेला प्रसूती कळा आल्याने दुपारी १ वाजता ही महिला मध्यवर्ती रुग्णालयात पोहोचली. मात्र, रुग्णालयात डॉक्टर नाहीत, असे सांगत तिला कळवा रुग्णालयात पाठवण्यात आले.
कळवा रुग्णालयात पोहोचल्यावर इथे फक्त कोरोना रुग्णांचेच उपचार केले जातात, असे सांगत महिलेला तिथूनही माघारी पाठवण्यात आले. प्रसुतीकळा असह्य झाल्या ती आई पुन्हा उल्हासनगरच्या त्याच रुग्णालयात दाखल झाली. दरम्यान, परतत असतानाच रुग्णवाहिकेतच बेशुद्ध पडली. दरम्यान, तिथेच ती प्रसूत झाली. बेशुद्ध अवस्थेत या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
 
 
दरम्यान, तिच्या बाळावर एनआयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे सुप्रिडेंट व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांना संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता ते एका महत्वाच्या व्हिडीयो काँन्सफर मिटींग मध्ये व्यस्त असल्याच जनसंपर्क अधिकारी वाघ यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाला आळा कधी बसणार ? डॉ. शिंदे यांनी जातीने लक्ष घालून गर्भवती महिलांच्या जिवाशी चाललेला हा खेळ त्वरीत थांबवावा.अन्यथा पुढील परीणामाला तयार राहावे, असा इशारा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिला आहे.



@@AUTHORINFO_V1@@