साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. साई सायन्सेस लिमिटेडकडून ३,०४३ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार असून गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
Read More
भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत सकारात्मक वाढ दिसून आली. सेन्सेक्स २३०.०२ अंकांच्या वाढीसह ८०,२३४.०८ च्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी ८०.४० अंकांनी वधारत २४,२७४.९० वर बंद झाला. जागतिक बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराने पुन्हा वेग पकडल्याचे पाहायला मिळाले.
ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली होती. दुसऱ्या दिवशी मात्र मार्केट बंद होताना मोठी घसरण नोंदविण्यात आली असून नफावसुली, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कंपन्यांचे दुस-या तिमाहीचे कमजोर निकाल यामुळे बाजार नकारात्मक परिणाम दिसून आला. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये भारतीय शेअर बाजारात नरमाई दिसून आली.
देशातील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आयपीओ लाँच करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वाी केली होती. त्यानंतर आता दि. ०६ नोव्हेंबर पासून सबस्क्रिप्शनकरिता खुला करण्यात आला असून ०८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना अप्लाय करता येणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून आयपीओ बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.
भारतीय शेअर बाजाराने दुपारच्या सुमारास मोठी उसळी घेतली असून सेन्सेक्स ९०१.५० अंकांनी तर निफ्टी २७०.७५ अंकांनी वधारला. दुपारच्या सुमारास अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल जाहीर होताच शेअर बाजारात सेन्सेक्स ८५९.४१ अंकांच्या वाढीसह ८०,३३६.०४ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ५० देखील २५१.८० अंकांच्या वाढीसह २४,४६५.१० च्या पातळीवर पोहोचला.
भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक वाढ नोंदविली आहे. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ दिसून आली आहे. पहिल्या सत्राच्या सुरूवातीच्या व्यवहारात घसरण होऊन दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. मेटल, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग खरेदीचा परिणाम बाजार बंद होताना तेजीत झाला. परिणामी, आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने वाढ नोंदवली.
नवीन संवत वर्षाच्या सुरूवातीला बाजाराची दिशा नेमकी कशी असेल, याबाबत बाजार विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच देशातील दोन प्रमुख भांडवली बाजार बीएसई, एनएसईने लक्ष्मीपूजनानिमित्त एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केला होता. या व्यापारी सत्रासह नवीन संवत २०८१ ची सुरुवात झाली. आता बाजारातील वातावरण नेमकं कसं असणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
मागील आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर विक्रीचा सपाटा सुरु होता. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर आता विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांबाबत नवी माहिती समोर आली आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) ऑक्टोबरमध्ये भारतीय शेअर बाजारातून ९४ हजार कोटी रुपये काढून घेतले आहे.
'पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड'च्या नफ्यात मोठी वाढ झाली असून सहामाहीत कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडचा नफा ९९ टक्क्यांनी वाढला आहे. सहामाहीत करपूर्व नफ्यात मोठी वाढ नोंदवत कच्च्या मालाची किंमत आणि निव्वळ कमी झाल्यामुळे ७,७०३ कोटी रुपये इतके आहे.
देशातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लवकरच बाजारात आयपीओ खुला केला जाणार आहे. दि. ०६ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शनकरिता खुला होणार आहे. स्विगीने आयपीओ जारी करत भारतीय भांडवली बाजारात आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्विगी आयपीओच्या माध्यमातून ११,३०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव, एफपीआयकडून मोठ्या प्रमाणात होणारी समभाग विक्री या सर्व कारणांचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स ८०,०६५.१६ पातळीवर तर निफ्टी ५० २४,३९९.४० च्या पातळीवर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून मागील काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्रीचा सपाटा सुरू आहे. सेन्सेक्स १३८.७४ अंकांच्या घसरणीसह ८०,०८१.९८ पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० देखील २४,४३५.५० च्या पातळीवर बंद झाला.
देशातल्या दोन बड्या आयटी कंपन्यांनी तिमाही निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ होत ३,२०९ कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी मोठा निर्णय देखील घेतला आहे. यावेळी संचालक मंडळाने बोनस शेअर देण्याची घोषणादेखील केली आहे.
'वारी एनर्जीज लिमिटेड'चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात दाखल होणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. कंपनी आयपीओद्वारे ४,३२१ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४,८००,००० इक्विटी समभाग विक्रीची ऑफर यामार्फत केली जाणार आहे.
ह्युंदाई मोटर कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. ह्युंदाई मोटर आयपीओच्या माध्यमातून बाजार भांडवल उभारणी करणार असून दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान खुला असणार आहे. कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून २७,८७०.१६ कोटी रुपये भांडवल उभारले जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स आयपीओचा एक लॉट ७ शेअर्सचा असून १८६५-१९६० प्राईस बँड ठेवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर कंपनी सूचीबध्द होणार आहे.
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड इश्यू लाँच होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आयपीओकरिता अप्लाय करता येणार आहे. ह्युंदाई मोटर्सने आयपीओसाठी १,८६५-१,९६० रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.
सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात वाढ दिसून आली. मागील काही दिवस बाजारात पडझडीचे सत्र सुरू होते. मध्य-पूर्वेतील संघर्ष आणि आरबीआय पतधोरण यासह अन्य गोष्टींचा परिणाम बाजारावर दिसून आला. आज हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत यामुळे घसरणीचा ट्रेंड थांबला आहे.
इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळताना दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारात घसरण झाली असून सेन्सेक्स ६३८.४५ अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी ५० ८१,०५० पातळीवर बंद झाला. आरबीआय एमपीसी बैठकीत रेपो रेट संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणेदेखील यानिमित्ताने महत्त्वाचे असणार आहे.
इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावानंतर जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होणार असून इराणच्या हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तेल विपणन, पेंट्स, एव्हिएशन आणि टायर यासारख्या प्रमुख तेल संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.
देशातील भांडवली बाजारात आयपीओ जोरदार इंट्री पाहायला मिळत आहे. बाजारातील आयपीओमध्ये गेल्या आठ महिन्यांत तीन पटीने वाढ झाली आहे.
आता कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ होणार आहे. आयपीओ(IPO)प्रमाणेच खात्यातील निधी ब्लॉक करण्यासाठी युपीआय सुविधा मिळणार आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार(एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) उद्या दि. ०२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त बंद राहणार आहे. गांधी जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली जाते त्यानुसार उद्या शेअर बाजारातील सर्व विभाग राहणार आहेत.
भारतीय भांडवली बाजाराचा ‘बुल’ सध्या उधळलेला असून, महिन्यातील काही दिवस सोडले, तर बर्याच अंशी बाजार वधारलेल्या स्थितीतच बघायला मिळतो. रालोआ सरकारच्या गेल्या दोन कालखंडात भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे.
आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्स तब्बल १२७२ अंकांनी घसरला असून निफ्टीदेखील २६ हजारांच्या खाली बंद झाला आहे. आज भारतीय शेअर बाजारात ऑटो आणि बँकिंग सेक्टरमधील समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. विक्री सत्रामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
भारतीय भांडवली बाजारात परेदशी गुंतवणूकदारांचा ओढा प्रचंड असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील वाढत्या कॅश फ्लोमुळे मार्केटमध्ये प्रचंड वोलॅटिलिटी दिसून येत आहे. जागतिक ट्रेंड, परदेशी गुंतवणूकदारांच्या सक्रियता आणि देशांतर्गत आघाडीवरील स्थूल आर्थिक डेटा या गोष्टी शेअर बाजाराची दिशा ठरवतील, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
दांता लिमिटेडच्या भागधारकांसाठी लवकरच मोठा निर्णय कंपनीकडून घेण्यात येणार आहे. वेदांता लिमिटेड कंपनी पुन्हा एकदा आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची तयारी करत असून कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत धातू आणि खाण क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी वेदांता कंपनी गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
सध्या शेअर बाजारात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीस अनेक कंपन्यांचे आयपीओज बाजारात दाखल झाले असून गुंतवणूकदारांकडून त्यास मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)ने परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बाजार नियामक सेबीने परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या नोंदणीसाठी फॉर्म प्रस्तावित केले आहेत. तसेच, अर्जदारांनी स्वाक्षरी केलेला सामायिक अर्ज आणि नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
शेअर बाजार सुरुवातीच्या घसरणीतून सावरला असून सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स २५५.८३ अंकांनी वधारून ८५,१६९.८७ पातळीवर स्थिरावला तर एनएसई निर्देशांक निफ्टी ५० ६३.७५ अंकांनी वधारत २६००४.१५ वर पोहोचला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सुरुवातीच्या तोट्यातून सावरले असून शेवटच्या सत्रात विक्रमी उच्चांकावर बंद झाला.
देशातील मोठी ब्रोकरेज फर्म झीरोधाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये चांगला नफा कमावला आहे. झीरोधाकडे ग्राहकांच्या डिमॅट खात्यांमध्ये ५.६६ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम असून ४,७०० कोटींचा नफा कमावला आहे.
आज शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ८.३० लाख कोटींची वाढ झाली आहे. वाढता विदेशी निधी प्रवाह आणि आशियाई बाजारातील मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. एकंदरीत, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला असून सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा कल कायम ठेवला आहे.
लक्झरी व्हिला रेंटल कंपनी स्टेयस्टा आगामी काळात आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६०० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करावयाची आहे.
भारतीय भांडवली बाजारात सध्या आयपीओंनी धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. या आठवड्यात ९०० कोटी रुपयांची बोली लावली जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी ११ आयपीओ दलाल स्ट्रीटला धमाल करतील, असा अंदाज गुंतवणूकदारांकडून वर्तविण्यात येत आहे.
भारत हा २०३० ते ३१ पर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने पुढे जात आहे, असा अंदाज स्टँडर्ड अँण्ड पूअर्स या पतसंस्थेने व्यक्त केला आहे. Share Market update today सुरुवातीच्या आर्थिक वर्षांत ही अर्थव्यवस्था ६.७ टक्क्यांनी वृद्धीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८.२ टक्क्यांनी वृद्धीसह लॉजिस्टीक, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसह सार्वजनिक क्षेत्रावरील भार कमी करण्यासाठी सातत्याने धोरणात्मक सुधारणा गरजेच्या आहेत. भविष्यात मजबूत वृद्धीसह शेअर बाजारा
अमेरिकन बाजारातील वाढीनंतर आज भारतीय बाजारदेखील वधारलेला दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ पाहायला मिळत असून बीएसई निर्देशांक सेन्सेक्स १४३१ अंकांनी वधारला आहे. तर निफ्टी ४७० अंकांची वाढ होत २५,३८८ वर बंद झाला आहे.
सरकारी मालकी असलेली कंपनी एनबीसीसी(इंडिया) लिमिटेडने पात्र भागधारकांना बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली आहे. याकरिता कंपनी ९० कोटी रुपयांच्या मोफत राखीव निधीचा वापर करणार आहे. दरम्यान, कंपनीने पात्र समभागधारकांस १:२ याप्रमाणानुसार बोर्डाने बोनस शेअर्स देण्यास आणि रेकॉर्ड डेट निश्चित करण्यास मान्यता दिली आहे.
देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी टाटा ग्रुपकडून शेअर बाजारात आपली कंपनी सूचीबध्द करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. टाटा ग्रुपने कंपनी सूचीबध्द न करता २० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाची ४१० अब्ज डॉलर होल्डिंग कंपनीकडून एनबीएफसी नोंदणी प्रमाणपत्र आरबीआयकडे सादर केले आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आज मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या समभाग किमतीत ६ टक्क्यांनी घट झाल्याने १३७ रुपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर किमतीत प्रचंड वाढ झाल्याने तज्ज्ञ व्यक्तींसह गुंतवणूकदार देखील हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रचंड वाढीसह शेअर होल्ड करण्याच्या सूचनेसह शेअर्समधील मूमेंट अत्यंत महत्त्वाचा असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दि. ०९ ऑगस्ट रोजी बाजारात सूचीबध्द झाल्यापासून ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या समभागाने प्रचंड उसळी घेतली आहे.
भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचे सत्र सुरू ठेवले आहे. ऑगस्ट महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल २१,१०१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना विविध कंपन्यांच्या आर्थिक निकालांचा विचार करावा लागणार आहे. तसेच, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या व्यावसायिक हालचाली व जागतिक कलानुसार या आठवड्यात शेअर बाजारातील चढ-उतार अंवलंबून असणार आहे.
हिंडेनबर्गच्या आरोपानंतर भारतीय भांडवली बाजारात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले होते. सलग दोन दिवसांच्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीत परतला आहे.
काँग्रेस पक्ष एकीकडे गुंतवणूकदारांना घाबरवत असताना दुसरीकडे पक्षाचे नेते राहुल गांधी यांची शेअर बाजारात करोडोंची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एलआयसी) चालू आर्थिक वर्षात इक्विटीमध्ये सुमारे १.३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करु इच्छित आहे.
सध्याच्या काळात शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमाविण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय न स्वीकारता अल्पमुदतीत शेअर विक्री आणि खरेदी करण्यावर बऱ्याच जणांचा भर असतो.
आत्मनिर्भर भारत या माध्यमातून देशांतर्गत संरक्षण उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. भारताने संरक्षणात मोठी गुंतवणूक केल्यामुळे संबंधित कंपन्यांच्या बाजार भांडवलात भरघोस वाढ झाली आहे. भारतीय शेअर बाजारात सूचीबध्द असलेल्या कोचीन शिपयार्ड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(बीईएल), हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेड(एचएएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड(बीडीएल), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई) इ. कंपन्यांच्या समभाग किंमती वाढल्या आहेत.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या जून महिन्यात भारतीयांनी म्युच्युअल फंडच्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (sip) मध्ये 21,262 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली. त्यानिमित्ताने मागील एका दशकात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांच्या वाढत्या कलाचे केलेले आकलन...
आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड शेअर्स मोठी वाढ दिसून आली आहे. या शेअरमधील ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड कंपनी कर्जमुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने पहिल्यांदाच ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकाने ७० हजारापासून ते ८० हजारांपर्यंतचा प्रवास अवघ्या सात महिन्यांत पूर्ण केला आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांक सेन्सेक्सने ८० हजारांचा टप्पा जवळपास ओलांडला आहे. या उच्चांकी पातळीसह बँकिंग क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रात खाजगी बँकांच्या समभाग प्रचंड वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे बँकेतील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे शेअरहोल्डिं जून तिमाहीत ५५ टक्क्यांनी खाली घसरले आहे.