नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आज मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या समभाग किमतीत ६ टक्क्यांनी घट झाल्याने १३७ रुपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना मालामाल केल्यानंतर आता मोठी घसरण दिसून आली आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या समभागाच्या आयपीओ दरम्यान नकारात्मक आणि कमकुवत लिस्टिंग असूनही समभागात मोठी वाढ झाली होती. त्यानंतरच्या आठवड्यात समभागाने चांगली गती राखली होती, असे तज्ज्ञांचे मत होते. गेल्या १५ दिवसांत कंपनीच्या बिझनेस स्टॅट्रेजी मूलभूत गोष्टींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे इतक्या तीव्र वाढीचे कारण शोधणे कठीण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तथापि, धोरणात्मकदृष्ट्या, व्यापारी आणि गुंतवणूकदार योग्य स्टॉप-लॉससह अपट्रेंडमध्ये राहू शकतात, असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ओला इलेक्ट्रिकच्या शेअर किमतीत प्रचंड वाढ झाल्याने तज्ज्ञ व्यक्तींसह गुंतवणूकदार देखील हैराण झाले होते. दरम्यान, या प्रचंड वाढीसह शेअर होल्ड करण्याच्या सूचनेसह शेअर्समधील मूमेंट अत्यंत महत्त्वाचा असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. दि. ०९ ऑगस्ट रोजी बाजारात सूचीबध्द झाल्यापासून ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या समभागाने प्रचंड उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले.