सेन्सेक्स ८३६.३४ तर निफ्टी २८४.७० अंकांनी कोसळला; जाणून घ्या घसरणी मागील प्रमुख कारणे
07-Nov-2024
Total Views |
मुंबई : ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली होती. दुसऱ्या दिवशी मात्र मार्केट बंद होताना मोठी घसरण नोंदविण्यात आली असून नफावसुली, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कंपन्यांचे दुस-या तिमाहीचे कमजोर निकाल यामुळे बाजार नकारात्मक परिणाम दिसून आला. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये भारतीय शेअर बाजारात नरमाई दिसून आली.
सेन्सेक्स ८०,५६३.४२ अंकांच्या वाढीसह ८३६.३४ अंकांच्या घसरणीसह ७९,५४१.७९ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० देखील २८४.७० अंकांच्या घसरणीसह २४,१९९.३५ च्या पातळीवर बंद झाला. परिणामी, दोन दिवसांच्या तेजीनंतर बाजार घसरला. सेन्सेक्समधील तीस कंपन्यांपैकी केवळ एसबीआय आणि टीसीएस समभागांनी वाढ नोंदविली तर उर्वरित समभाग घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारातील घसरणीमागील ४ मोठी कारणे जाणून घेऊयात. अमेरिकन निवडणुकीत विजयानंतर बाजारात तेजीचा फायदा घेत अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुक केल्यामुळे बाजार बंद झाला. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदार सावध दृष्टिकोन अवलंबित आहेत. त्याच वेळी, परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. देशांतर्गत कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.