या आठवड्यात तब्बल १० कंपन्यांचे आयपीओ येणार; जाणून घ्या संपूर्ण तपशील

    22-Sep-2024
Total Views |
upcoming-ipo-bidding-for-ipo-share market


मुंबई :
    भारतीय भांडवली बाजारात सध्या आयपीओनी धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. या आठवड्यात ९०० कोटी रुपयांची बोली लावली जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी ११ आयपीओ दलाल स्ट्रीटला धमाल करतील, असा अंदाज गुंतवणूकदारांकडून वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, येत्या २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात २ मेनबोर्ड सेगमेंट आयपीओ आणि ९ एसएमई सेगमेंट आयपीओज दलाल स्ट्रीटवर चर्चेचा विषय ठरतील. विशेष म्हणजे मागील आठवड्यात बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आगमनाने गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.


हे वाचलंत का? -    टीम इंडियाचा बांगलादेशवर २८० धावांनी दणदणीत विजय!


मनाबा फायनान्स लिमिटेड ही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) असून दुचाकी, तीन-चाकी, इलेक्ट्रिक दुचाकी (EV2Ws), इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर (EV3Ws), वापरलेल्या कार खरेदीसाठी कर्ज देते. याशिवाय, कंपनी लहान व्यवसाय आणि वैयक्तिक कर्जासाठी देखील कर्ज देते. कंपनी आयपीओच्या माध्यमातून १५०.८४ कोटी रुपये उभारणार आहे. निधी उभारणी नवीन इश्यूद्वारे म्हणजेच एकूण इश्यू आकार १२,५७०,००० शेअर्स आहे.

रॅपिड वाल्व्ह (इंडिया) लिमिटेड कंपनी आयपीओद्वारे ३०.४१ कोटी रुपये इतके भांडवल उभारेल. आयपीओ दि. २३ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २५ सप्टेंबर रोजी बंद होईल. प्राइस बँड २१०-२२२ रुपये प्रति शेअर असून लॉट साइज 600 शेअर्स आहे. TechEra Engineering Limited IPO, Unilex Colours and Chemicals Limited IPO, Thinking Hats Entertainment Solutions Limited IPO, Forge Auto International IPO, Saj Hotels Limited IPO इ. कंपन्यांचे आयपीओज बाजारात दाखल होणार आहे.