नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकच्या शेअर किमतीत प्रचंड वाढ झाल्याने तज्ज्ञ व्यक्तींसह गुंतवणूकदार देखील हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रचंड वाढीसह शेअर होल्ड करण्याच्या सूचनेसह शेअर्समधील मूमेंट अत्यंत महत्त्वाचा असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दि. ०९ ऑगस्ट रोजी बाजारात सूचीबध्द झाल्यापासून ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या समभागाने प्रचंड उसळी घेतली आहे.
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक शेअर सूचीबद्ध झाल्यापासून ओला इलेक्ट्रिकच्या समभागाने ७६ रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा ९२ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली आहे. आयपीओ द्वारे सूचीबध्द झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट लागल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर, शेअर्सची वाढती किंमत लक्षात घेता पहिल्याच १० टक्के वाढीसह गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला. त्यानंतर आता कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या जोखीम आधारित किमतीत घट आणि बॅटरी वेंचर्ससह इतर गोष्टींकडे कंपनीचे लक्ष असल्याची माहिती आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्समध्ये नियामक समर्थन अबाधित राहील त्यामुळे ओला नजीकच्या काळात जास्तीत जास्त व्हॉल्यूम वाढवण्याचा प्रयत्न करेल. जास्त व्हॉल्यूम म्हणजे उत्तम ऑपरेटिंग लेव्हरेज आणि संबंधित नियामक आधारास सक्षम आहे, असे ब्रोकरेज फर्म्सचे म्हणणे आहे.