शेअर बाजारात आयटी सेक्टरची चलती, इन्फोसिस, टीसीएससह अन्य कंपन्यांचे शेअर्स वधारले

    14-Aug-2024
Total Views |
indian share market it sector


मुंबई :        हिंडेनबर्गच्या आरोपानंतर भारतीय भांडवली बाजारात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले होते. सलग दोन दिवसांच्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीत परतला आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला तर निफ्टी ४.७५ अंकावर बंद झाला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीचे शेअर्समधील घसरणीनंतर पुन्हा कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. आज मार्केटमध्ये दिवसभर आयटी सेक्टरमधील शेअर्सचा बोलबाला राहिला आहे.


हे वाचलंत का?  -      जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांनी केली 'या' कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी


दरम्यान, आयटी समभागांच्या वाढीमुळे भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. बीएसई ३० शेअर्सचा सेन्सेक्स १४९.८५ अंकांनी वाढून ७९,१०५.८८ वर बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांकात ७८,८९५.७२ आणि ७९,२२८.९४ च्या रेंजमध्ये व्यवहार झाला आहे. निफ्टीने आज २४,०९९.७० आणि २४,१९६.५० च्या रेंजमध्ये व्यवहार केला.

सेन्सेक्समधील टॉप ३० कंपन्यांच्या समभागांपैकी टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एम&एम यात मोठी वाढ झाली. अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांच्या शेअर्स किमतीत सर्वाधिक घट झाली आहे.