गेल्या पाच महिन्यांत राहुल गांधींनी कमावले 'इतके' कोटी; जाणून घ्या इतक्या कोटींचा पोर्टफोलिओ!
13-Aug-2024
Total Views | 46
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष एकीकडे गुंतवणूकदारांना घाबरवत असताना दुसरीकडे पक्षाचे नेते राहुल गांधी यांची शेअर बाजारात करोडोंची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधींचा पोर्टफोलिओ तब्बल ४.८० कोटी रुपयांचा असून विविध कंपन्यांमध्ये लाखो रुपयांचे शेअर्स असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, एकीकडे काँग्रेस पक्ष 'हिंडेनबर्ग रिसर्च' सारख्या संस्थांच्या अहवालाच्या आधारे भारतीय शेअर बाजार खाली आणण्यात व्यस्त असताना दिसून येत आहे. तसेच, दुसरीकडे पक्षाचे नेते राहुल गांधी हे शेअर बाजारात पैसे गुंतवून मोठी कमाई करत आहेत. आकडेवारीनुसार, याच भारतीय शेअर बाजारात राहुल गांधींनी गेल्या ५ महिन्यांत स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून ४६.५० लाख रुपये कमावले आहेत.
राहुल गांधी यांच्याकडे सध्या २४ कंपन्यांचे शेअर्स असून त्यांच्याकडे ‘पिडलाइट इंडस्ट्रीज’ चे सर्वाधिक मूल्याचे शेअर्स आहेत ज्याची किंमत ४४.९५ लाख आहे. दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्याकडे ३७.५२ लाख रुपयांचे 'एशियन पेंट्स'चे शेअर्स आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे 'बजाज फायनान्स'चे ३६.४७ लाख रुपयांचे शेअर्स तर HULचे ३१.९७ लाख रुपयांचे शेअर्स आहेत. याशिवाय, टायटनचे २९.४१ लाख रुपये, ‘डिव्हिस लॅब’चे २७.७१ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेचे २७.०१ लाख रुपयांचे शेअर्स आहेत.
केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना राहुल गांधी यांनी दि. १५ मार्च २०२४ रोजी दिलेल्या आकडेवारीवर आधारित आहे. दुसरीकडे, हिंडेनबर्गने 'सेबी'च्या अध्यक्षा माधवी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गौतम अदानी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप केला. हिंडेनबर्ग अहवालानंतर राहुल गांधी म्हणाले होते की, सर्वसामान्यांची गुंतवणूक धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे म्हटले होते.